Tarun Bharat

बुवाची सौंदत्ती येथे 46 पोती दूध पावडर जप्त

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

क्षीरभाग्य योजनेतील दूध पावडर घरात साठविणाऱया दोघा जणांना रायबाग पोलिसांनी अटक केली आहे. बुवाची सौंदत्ती (ता. रायबाग) येथे ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी 46 पोती दूध पावडर जप्त केली आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली रायबागचे पोलीस निरीक्षक एच. डी. मुल्ला व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. बुवाची सौंदत्ती येथील दोन घरांमध्ये क्षीरभाग्य योजनेतील दूध पावडर साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच अचानक छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

राजूगौडा पाटील (वय 45), सुनील गोरव (वय 35, दोघेही रा. बुवाची सौंदत्ती) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. प्रत्येकी 25 किलोची 46 पोती जप्त करुन पोलिसांनी त्या दोघा जणांना न्यायालयासमोर हजर केले आहे. क्षीरभाग्य योजनेतून दूध पावडर विक्री प्रकरण उत्तर कर्नाटकात चांगलेच गाजत आहे. कारण बागलकोट जिल्हय़ात झालेल्या एका प्रकरणाची चौकशी सध्या सीआयडीचे अधिकारी करत आहेत.

Related Stories

लोककल्प फौंडेशनतर्फे वृद्धाश्रम संस्थेस जीवनावश्यक वस्तू भेट

Amit Kulkarni

महसूल कर्मचाऱयांच्या बदल्या

Amit Kulkarni

गांजा विकणाऱया तरुणाला अटक

Amit Kulkarni

खून करणाऱया ‘त्या’ सासरच्या मंडळींवर कारवाई करा

Omkar B

हस्तशिल्पी संस्थेतर्फे उद्यापासून सिल्क इंडिया प्रदर्शन

Amit Kulkarni

कोरोना काळात लॅब टेक्निशियनची सेवा कौतुकास्पद

Omkar B
error: Content is protected !!