Tarun Bharat

बुसेलोसिस लसीकरण मोहिमेला प्रारंभ

प्रतिनिधी /बेळगाव

जिल्हय़ात ब्रुसेलोसिस प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. दुसऱया टप्प्यातील ही लसीकरण मोहीम घरोघरी जावून राबविली जात आहे. ब्रुसेलोसिस हा संसर्गजन्य रोग असल्याने त्याची जनावरांना लागण झाल्यास मानवालादेखील धोका पोहोचू शकतो. याकरिता पशुपालकांनी खबरदारी म्हणून 4 ते 8 वयोगटातील मादी जातीच्या वासरांना आणि रेडकांना लस करून घ्यावी, असे आवाहन खात्याने केले आहे.

राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ही लसीकरण मोहीम राबविली जात आहे. याअंतर्गत गायी-म्हशींच्या मादी जातीच्या वासरांना प्रतिबंधक लस दिली जाते. सप्टेंबरदरम्यान पहिल्या टप्प्यात राबविलेल्या मोहिमेत तब्बल 29 हजार वासरांना लस दिली आहे. आता उर्वरित वासरांना दुसऱया टप्प्यात लस टोचली जाणार आहे. जिल्हय़ात तब्बल 28 लाख 9 हजार 109 जनावरे आहेत. त्यामुळे साहजिकच गाय-म्हशींची वासरे आणि रेडकांची संख्या अधिक आहे. जनावरांना याची लागण झाल्यास गर्भपाताचा धोका असतो. त्यामुळे भविष्यातील धोका टाळण्यासाठी लहान मादी जनावरांना लस घेणे आवश्यक आहे. ब्रुसेलोसिसची लागण झालेल्या जनावरांच्या संपर्कात आल्यास पशुपालकांनादेखील धोका पोहोचू शकतो. शिवाय अशा जनावरांचे दूधदेखील शरीरास अपायकारक असते. त्यामुळे खबरदारी म्हणून पशुपालकांनी आपल्या वासरांना लस टोचून घ्यावी.

धोका टाळण्यासाठी वासरांना लस करून घ्या

जिल्हय़ात ब्रुसेलोसिस प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला दि. 7 फेबुवारीपासून सुरुवात केली आहे. पशुपालकांनी भविष्यातील धोका टाळण्यासाठी वासरांना लस करून घ्यावी. जिल्हय़ातील 1 लाख 10 हजार वासरांना लस दिली जाणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात 29 हजार लस दिली आहे.

डॉ. ए. के. चंद्रशेखर (उपनिर्देशक पशुसंगोपन खाते)

Related Stories

सुपा धरणातून पाणी न सोडल्याने राफ्टिंग ठप्प

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांना करावी लागतेय चिखलातून पायपीट

Amit Kulkarni

कणबर्गी योजनेत राबविणार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

Amit Kulkarni

मजगाव येथे पोलिसांचे पथसंचलन

Patil_p

प्रलंबित वसाहत योजना मार्गी लावणार

Amit Kulkarni

किरकोळ बाजारात पालेभाज्यांची आवक मंदावली

Patil_p