Tarun Bharat

बेंगलोरची ओडिशा एफसीशी बरोबरी

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

आयएसएल फुटबॉल स्पर्धेत बेंगलोर एफसी आणि ओडिशा एफसी यांच्यातील रोमहर्षक लढत 1-1 अशी बरोबरीत संपली. रविवारी हा सामना फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर खेळविण्यात आला. मध्यंतराला ओडिशाचा संघ डायगो मॉरिसियोने नोंदविलेल्या गोलमुळे आघाडीवर होता. दुसऱया सत्रात बेंगलोरच्या एरीक पार्तालूने बरोबरीचा गोल केला.

या निकालाने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. बेंगलोर एफसीचे आता 13 सामन्यांतून 3 विजय आणि प्रत्येकी पाच बरोबरी आणि पराभवामुळे 14 गुण झाले असून ते सहाव्या स्थानावर आहेत. शेवटच्या स्थानावर अजुनही असलेल्या ओडिशा एफसीची आता 13 सामन्यांतून एक विजय, पाच बरोबरी आणि सात बरोबरीने 8 गुण झाले आहेत.

ओडिशा एफसीने या सामन्याची सुरूवात धडाकेबाज पद्धतीने करताना आठव्याच मिनिटाला गोल केला. जॅरी माविहमिंगथांगा आणि मान्यूएल ऑन्वूने रचलेल्या चालीवर डायगो मॉरिसियोने बेंगलोर एफसीचा गोलरक्षक गुरप्रीतसिंगला लिलया भेदले आणि चेंडू जाळीत टोलविला. त्यानंतर 15व्या मिनिटाला मान्यूएल ऑन्वूचा गोल करण्याचा यत्न गुरप्रीत सिंगने चपळ गोलरक्षण करून उधळून लावला.

या गोलनंतर देन वेळा बेंगलोर एफसीला गोल बाद करण्याच्या संधी मिळाल्या होत्या. प्रथम 38 व्या मिनिटाला राहुल भेकेच्या क्रॉसवर एरीक पार्तालूचा जबरदस्त हेडर ओडिशा एफसीचा गोलरक्षक अर्शदीपने अडविला तर परत एकदा 41 व्या मिनिटाला अर्शदीपने क्लिटॉन सिल्वाच्या क्रॉसवर राहुल भेके याचा हेडर गोलमध्ये जाताना अडविला.

दुसऱया सत्रातील खेळावर बेंगलोर एफसीने छाप पाडली, मात्र मिळालेल्या संधींचे गोलमध्ये रूपांतर करण्यात त्यांचे स्ट्रायकर अपयशी ठरले. प्रथम अमेय मोरजकरच्या स्थानावर आलेल्या क्रिस्टियान ऑपसॅतचा फ्रिकीकवरील फटका अर्शदीपने अडविला. त्यानंतर ऑपसॅतने दोन वेळा गोल करण्याच्या संधी चेंडूवरील अयोग्य नियंत्रण आणि सदोष नेमबाजीमुळे दवडल्या. त्यापूर्वी ओडिसाच्या जॅरी माविहमिंगथांगाने मान्यूएल ऑन्वूने दिलेल्या पासवर गोल करण्याची सोपी संधी कमजोर फटका हाणून दवडली. प्रत्युत्तरादाखल बेंगलोरच्या राहुल भेके याच्या क्रॉसवर फ्रान्सिस्को गोन्साल्वीसचा हेडर कमजोर ठरला.

बेंगलोर एफसीने सामन्याच्या 82 व्या मिनिटाला बरोबरीचा गोल केला. घेतलेल्या कॉर्नरवर एक जबरदस्त हेडर घेऊन एरीक पार्तालूने अर्शदीप सिंगला चकविले आणि बरोबरीचा गोल केला. दोनच मिनिटांनी ओडिशाच्या डॅनियल लाललुमपुईया आणि बेंगलोर एफसीच्या सुनील छेत्री आणि क्लिटॉन सिल्वा यांनी गोल करण्याच्या सोप्या संधी गमविल्या. शेवटच्या क्षणी ओडिशाच्या जॅरी माविहमिंगथांगाने अगदी जवळून हाणलेला शॉट बेंगलोरचा गोलरक्षक गुरप्रीतने डाईव्ह मारून अडविल्याने त्यांची विजय गोल करण्याची संधी हुकली.

Related Stories

गणादीप शेल्डेकर यांना पितृशोक

Amit Kulkarni

पर्वरीत 19 लाखांसह एटीएम मशिन लांबविले

Patil_p

राज्यातील खनिज वाहतूक 13 जूननंतर बंद

tarunbharat

‘त्या’ कंडक्टरची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Amit Kulkarni

गोव्यात 20 नव्या उद्योगांना मान्यता

Amit Kulkarni

जीएसएलतर्फे गोव्याला ऑक्सजिन जनरेटिंग प्लांट

Amit Kulkarni
error: Content is protected !!