Tarun Bharat

बेंगलोर एफसीचा स्पर्धेत पहिला विजय

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

कप्तान सुनील छेत्रीने पॅनल्टीवर नोंदविलेल्या एकमेव गोलमुळे बेंगलोर एफसीने आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील ‘सदर्न डर्बी‘ जिंकताना चेन्नईन एफसीला नमविले. काल हा सामना बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात आला. बेंगलोर एफसीचा हा पहिला विजय ठरला. या विजयाने त्यांना 3 गुण प्राप्त झाले. त्यांचे आता 3 सामन्यांतून 5 तर चेन्नईन एफसीचे तेवढय़ाच सामन्यांतून 4 गुण आहेत.

दुसऱयाच मिनिटाला बेंगलोर एफसीने पहिली धोकादायक चाल रचली. दिमास देल्गादोने दिलेल्या पासवर क्लिटन सिल्वाचा गोल करण्याचा यत्न फसला. तिसऱयाच मिनिटाला काऊंटर ऍटेकवर चेन्नईन एफसीचा कप्तान क्रिव्हेलेरोचा फ्रिकीकवर गोल करण्याच्या यत्न गोलच्या आडव्या पट्टीवरून गेला.

चेन्नईनला धक्का

सोळाव्या मिनिटाला चेन्नईन एफसीला मोठा धक्का बसला. त्यांचा प्लेमेकर अनिरुद्ध थापा जखमी झाल्याने त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. त्यानंतर त्याच्या स्थानावर एडवीन वंसपॉल खेळण्यासाठी आला. चेन्नईन एफसीने पहिल्या सत्रात चांगला खेळ केला आणि मैदानाच्या दोन्ही बगलेतून पद्धतशीरपणे आक्रमणेही रचली.

अशाच एका चालीवर त्यांच्या इस्माईल गोन्साल्वीसने दिलेल्या क्रॉस पासवर राफायल क्रिव्हेलोरोचा फटका बेंगलोरचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूने अडविला.

दिशाहीन ड्राईव्हमुळे निराशा

बेंगलोर एफसीलाही गोल करण्याची संधी प्राप्त झाली होती. मात्र देल्गादो आणि क्लिटन सिल्वाने रचलेल्या चालीवर राहुल भिकेचा ड्राईव्ह दिशाहीन ठरला. या दिशाहीन ड्राईव्हमुळे बेंगलोर एफसी संघाची संधी निष्फळ ठरली.

दुसऱया सत्रात पॅनल्टीवर बेंगलोर एफसीने आघाडी 56व्या मिनिटाला घेतली. सुनील छेत्रीने विशाल कैथला भेदले आणि बेंगलोरचा पहिला गोल केला. एडवीन वंसपॉलने बेंगलोरचा मीडीफल्डर क्लिटन सिल्वाला डी कक्षेत धोकादायक पद्धतीने पाडल्याबद्दल रेफ्रीने पॅनल्टी फटका बहाल केला होता.

बेंगलोरला चारच मिनिटांनी आपली आघाडी वाढविण्याची संधीही मिळाली होती, कालच्या या सदर्न डर्बीवर प्रामुख्याने विजयी चेन्नईन एफसीचे वर्चस्व आढळून आले.

Related Stories

अस्तित्वासाठी झगडणाऱ्या केकेआरसमोर आज आरसीबीचे आव्हान

Patil_p

स्पोर्ट्स mania

Amit Kulkarni

NzvsIND : भारताची विजयी सलामी

Archana Banage

भारताला आणखी दोन कांस्यपदके

Amit Kulkarni

कबड्डी : भारत पेट्रोलियमचा मुंबई पोलिसवर १५ गुणांनी विजय

Archana Banage

आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये दिवंगत विनू मंकड यांना स्थान

Patil_p