Tarun Bharat

बेंगलोर एफसीच्या ताफ्यात 19 वर्षीय हरमनप्रीत सिंग

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

बेंगलोर एफसीने यंदाच्या आयएसएल फुटबॉल मोसमात 19 वर्षीय हरमनप्रीत सिंग याला फ्री ट्रान्सफरवर करारबद्ध केले आहे. ईस्ट बंगालसाठी विंगरच्या स्थानावर खेळणारा हरमनप्रीत पंजाबच्या युनायटेड पंजाब एफसीला प्रारंभी खेळत होता.

2018 मोसमात हिरो आय-लीग फुटबॉल स्पर्धेत तो इंडियन ऍरोज संघाला 14 सामन्यांत खेळला. त्यानंतर मागील मोसमात तो पहिल्यांदाच खेळणाऱया ईस्ट बंगाल एससीसाठी सात सामन्यांत खेळला. बेंगलोर एफसीशी करार केल्यानंतर हरमनप्रीत सिंगने आनंद व्यक्त केला. अनुभवी सुनील छेत्री आणि गुरप्रीतसिंग समवेत खेळण्याची मला आता संधी मिळणार असल्याचे तो म्हणाला.

कुठल्याही स्थानावर खेळण्याची क्षमता असलेला हरमनप्रीत सिंग हा फुटबॉल खेळणाऱया कुटूंबातील असून त्याचे वडील सतनाम सिंग हे पंजाब पोलीसला तर काका जेसीटी मिल्स फगवाडाला खेळत होते.

Related Stories

जनता जागृत असल्यास कुठल्याही यक्षप्रश्नावर उतारा शक्य !

Amit Kulkarni

चांदर येथे तरूणीला भर दिवसा दोन युवकांनी ‘डेटॉल’ पाजले

Patil_p

दुबईहून गोमंतकीय राज्यात परतणार

Omkar B

राज्यात शुक्रवारपर्यंत मुसळधार पाऊस

Amit Kulkarni

मडगावात महिलेकडून पाच लाखांचे अमलीपदार्थ जप्त

Amit Kulkarni

दहावीची मुख्य परीक्षा आजपासून

Omkar B