Tarun Bharat

बेंगळूरमधील शाळा, महाविद्यालये आणि विद्यार्थी वसतिगृहे कंटेनमेंट झोन

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

बेंगळूरमधील एकूण २९ सक्रिय कंटेनमेंट झोनपैकी १० शाळा, महाविद्यालये किंवा विद्यार्थी वसतिगृहे आहेत. यामध्ये आर्य एडिगा गर्ल्स हॉस्टेल (बीबीएमपी वेस्ट), किरण हायस्कूल, शंकरेश्वर शासकीय शाळा, एसबीएम इंग्लिश हायस्कूल (तिन्ही दशरहळ्ळी विभागातील), संभ्रम अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (येळहांका), अशोका पॉलिटेक्निक (दशरहळ्ळी), आरव्ही गर्ल्स नर्सिंग वसतिगृह (बीबीएमपी दक्षिण), बीबीएमपी बॉईज हायस्कूल (बीबीएमपी पूर्व) आणि शासकीय हायस्कूल (दशरहळ्ळी) हे कंटेनमेंट झोन आहेत.

दरम्यान कोरोना रुग्ण वाढत असल्याने संस्था बंद करण्याचा निर्णय सरकार घेणार का, असे विचारले असता मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी, मुले घरापेक्षा शाळांमध्ये अधिक “शिस्तबद्ध” असतात. त्यांनी स्पष्ट केले की, “मुले जेव्हा सामाजिक अंतर पाळतील, मास्क घालतील आणि सॅनिटायझर्स वापरतील. जर ते घरी असतील तर त्यांच्यात इतर मुलांशी मिसळण्याची शक्यता जास्त असते की त्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.” दरम्यान, अनेक खासगी शाळांनी दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व वर्ग फक्त ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

खाते वाटपावरून मंत्री आनंद सिंह यांनी दिली राजीनाम्याची धमकी

Abhijeet Shinde

चार खात्यांसाठी सिंगल विंडो जारी करणार

Amit Kulkarni

कर्नाटक: मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना म्हैसूर विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान

Abhijeet Shinde

बेंगळूरमध्ये भाजपच्या माजी नगरसेविकेची हत्या

Abhijeet Shinde

कर्नाटकमध्ये लॉकडाऊन कायम ठेवा: टीएसी ची शिफारस

Abhijeet Shinde

राज्य सरकारकडूनही अनलॉक 5.0 मार्गसूचीचा विस्तार

Patil_p
error: Content is protected !!