Tarun Bharat

बेंगळूरमध्ये कोरोनाचे ६२ हजाराहून अधिक सक्रिय रुग्ण

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात कोरोना रुग्णवाढीचे सत्र सुरूच आहे. राज्याबरोबरच राजधानी बेंगळूरमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सलग तीन दिवस राज्यात १० हजारहून अधिक कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत. तर बेंगळूरमध्येही दररोज ५ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची भर पडत आहे. शुक्रवारी बेंगळूरमध्ये कोरोनाचे ५००९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तर ५७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून ३,०४५ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.

बेंगळूर शहरी जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या २,७२,३७१ वर पोहचली असून यापैकी ६२,१०४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे ३,२९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या १,१८,८५१ इतकी आहे. राज्यात आतापर्यंत ६,९०,२६९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

Related Stories

बेपत्ता कोविड रुग्णांना कारवाईचा इशारा

Amit Kulkarni

एकाच कुटुंबातील सहा जणांची आत्महत्या

Amit Kulkarni

बीबीएमपीने कोरोना नियंत्रणासाठी अपार्टमेंटमधील जिम, जलतरण तलाव, पार्टी हॉल बंद करण्याची केली शिफारस

Abhijeet Shinde

बेंगळूर: प्रश्नपत्रिका फुटल्याने बी.कॉमची परीक्षा पुढे ढकलली

Abhijeet Shinde

दिवसभरात 2,039 जण कोरोनामुक्त

Amit Kulkarni

राज्यात कोरोना पॉझिटिव्हिटी दर 2.59 टक्के

Amit Kulkarni
error: Content is protected !!