Tarun Bharat

बेंगळूरमध्ये कोरोना रुग्णांनी बेड फुल्ल

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

बेंगळूरमध्ये कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये कोविड केअर सेंटरमधील बेड्स, सरकारी रुग्णालये आणि खासगी रुग्णालये वेगाने भरत आहेत. राज्यात सर्वाधिक कोरोनाची संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. इतर जिल्ह्यांपेक्षा बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वेगानं वाढत आहेत त्यातले जवळपास सर्वच बेड फुल्ल आहेत.

बृह बेंगळूर महानगर पालिकेच्या (बीबीएमपी) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळपर्यंत बेंगळूरमध्ये ५५ हजारापेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आहेत.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये देण्यात आलेल्या ३,४७४ शासकीय कोटा बेडपैकी केवळ ८७२ बेड उपलब्ध आहेत.

शहरातील सकारात्मकतेचे प्रमाण ६.२ पर्यंत पोहोचला आहे. बीबीएमपीने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी २६,२६२ लोक घरात अलिप्त होते, ३,८७७ रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाले आणि १,०७१ खासगी कोविड केअर सेंटरमध्ये आहेत.

Related Stories

राज्य सहकार महामंडळाच्या अध्यक्षपदी देवेगौडा

Amit Kulkarni

सीईटी : अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ात सर्वाधिक कुपोषित बालके

Amit Kulkarni

मुडेवाडी प्राथमिक शाळेच्या इमारतीची भिंत पावसामुळे कोसळली

Tousif Mujawar

कर्नाटक राज्य पाणीपुरवठा मंडळाचे निवृत्त अभियंता प्रसन्न मूर्ती यांचे निधन

Tousif Mujawar

कर्नाटक: परिवहन कामगारांचा संप कायम, बससेवा विस्कळीत

Archana Banage
error: Content is protected !!