Tarun Bharat

बेंगळूरमध्ये दर तासाला ७०० जण कोरोना पॉझिटिव्ह

बेंगळूर/प्रतिनिधी

राजधानी बेंगळूरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वेग वाढला आहे. जिल्ह्यात दर तासाला ७०० जण पॉझिटिव्ह येत आहेत आणि उपलब्ध आकडेवारीनुसार प्रत्येक व्यक्ती आठ जणांच्या संपर्कात येत आहेत. शहरात दररोज सरासरी १५ हजाराहून अधिक नवीन रुग्ण सापडत आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालयाच्या बेड, विशेषत: आयसीयू आणि व्हेंटिलेटरच्या मागणीमुळे आरोग्याच्या सुविधांवर परिणाम झाला आहे.

“आम्ही आमचे प्रयत्न करत आहोत, परंतु रुग्णालयातील बेड्स रात्रीत उपलब्ध होऊ शकत नाहीत,” असे मुख्य सचिव पी. रवी कुमार यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी ऑक्सिजनयुक्त बेड वाढविण्याची विनंती केली आहे, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित केले. “आम्ही युद्धाच्या परिस्थितीत आहोत; आम्ही लढत आहोत, ”असे ते म्हणाले.

बेंगळूरच्या वाढत्या कोरोना रुग्णामुळे आरोग्य तज्ञ आणि नोकरशहांना चकित केले आहे. कोरोना परिस्थिती अत्यंत वाईट आहे. लोक इस्पितळात बेड घ्यायला हतबल आहेत, ”असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालयांना सुविधा पुरवण्यास कमी पडत आहोत. त्यासाठी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.

Related Stories

‘आयएनएस’च्या कार्यकारिणीपदी किरण ठाकूर यांची फेरनिवड

Archana Banage

“भाजपसोबत राहिलो असतो, तर मुख्यमंत्री असतो”

Archana Banage

कर्नाटक: राज्यात कोरोना मृतांची संख्या १२ हजाराच्यावर

Archana Banage

मुख्यमंत्र्यांच्या मुलानेच मोडले कोरोना निर्बंध

Archana Banage

राज्यात बुधवारी कोरोनाचे 1,649 नवे रुग्ण

Amit Kulkarni

मुख्यमंत्री बोम्माई यांनी पूर परिस्थिती पाहणी दौऱ्यापूर्वी येडियुराप्पांची घेतली भेट

Archana Banage
error: Content is protected !!