Tarun Bharat

बेंगळूरला जाणार्‍या गाड्यांची मागणी वाढली

Advertisements


बेंगळूर /प्रतिनिधी

देशात कोरोनाचे मोठे संकट असताना एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मात्र दुसरीकडे परप्रांतीयांनी आपापल्या राज्यात स्थलांतर करण्यास जोर धरला होता. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यांनतर परप्रांतीय कामगारांचे मोठ्याप्रमाणात स्थलांतर झाले. बेंगळूर मधील बहुतांश स्थलांतरित कामगार बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, झारखंड, ओडिशा आणि राजस्थानमधील होते. पण आता हे स्थलांतरित कामगार परत येताना पाहायलामिळत आहेत. पश्चिम बंगाल आणि बिहारमधील अनेक प्रवाशी गाड्यांच्या माध्यमातून बेंगळूरला पोहोचत आहेत. रेल्वे विभागाने दानापूर (बिहार), मुंबई आणि हावडा येथून रेल्वे आणि दिल्ली ते बेंगळूर या दोन गाड्या चालविल्या आहेत. नोकरीच्या शोधात परप्रांतीय कामगार शहरात परतत असल्याचे हे संकेत असू शकतात.

Related Stories

रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात

Amit Kulkarni

अब की बार, तडीपार!

Amit Kulkarni

बेळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

Tousif Mujawar

होमगार्ड कमांडंटविरुद्ध पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Patil_p

विनामास्क फिरणाऱयांना बसतोय चाप

Patil_p

जिल्हा प्रशासनातर्फे सेवालाल जयंती साधेपणाने

Amit Kulkarni
error: Content is protected !!