Tarun Bharat

बेंगळूर अजूनही ‘ऑक्सिजन’वर

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या सांखते घेत होत असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान बेंगळूरमध्येही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. परंतु ऑक्सिजनची मागणी मात्र कमी झालेली नाही. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची मागणी वाढत असल्याने रुग्णसंख्या कमी होऊनपण ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. दरम्यान, बेंगळूरमध्ये कोरोना प्रकरणांची संख्या ६ मे रोजी २३ हजाराच्यावर होती. लाॅकडऊननंतर जिल्हयात कोरोना रुगणांची संख्या कमी होताना दिसत आहे. आता ती ७५,०० पेक्षा कमी आहे. परंतू, जिल्हयात ऑक्सिजनच्या मागणीत तशी घट झालेली नाही.

अधिकाऱ्यांच्या मते, बीबीएमपी झोनमध्ये असलेल्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा वापर फारसा कमी झाला नाही कारण आयसीयू आणि आयसीयू व्हेंटिलेटर बेडची मागणी कमी झालेली नाही. त्यामुळे ऑक्सिजनचा वापर फारसा कमी झालेला नाही.

हरातील ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी नोडल अधिकारी असलेले आयएएस अधिकारी मुनीश मौदगिल म्हणाले, “आम्हाला दररोज ऑक्सिजनचा विशेष पुरवठा होत आहे. सोमवारी, १५० मेट्रिक टन (एमटी) ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला, रविवारी १०९ टन आणि शनिवारी ६८.८ मे.टन ऑक्सिजन पुरविला गेला. आम्ही या विशेष वाटपासह ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थापित करण्यास सक्षम आहोत. मंगळवारी आणखी ११५ मेट्रिक टन पुरवठा होण्याची शक्यता आहे. ”

२ दिवस भासणार ऑक्सिजनची कमतरता
मुख्य सचिव पी. रवी कुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, काही कारणास्तव बळ्ळीरीमध्ये २२० मे.टन ऑक्सिजन उत्पादन कमी झाल्यामुळे उपलब्धतेत संकट निर्माण होत आहे. बुधवारी सकाळपर्यंत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस सर्व जिल्ह्यांना ऑक्सिजन पुरवठा २० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. डीसींना ऑक्सिजनचा वापर काळजीपूर्वक व्यवस्थापित करण्यास सांगण्यात आले आहे आणि अधिकाऱ्यांना ऑक्सिजन साठा आणि बफर स्टॉक वापराची योजना तयार करण्यास सांगितले गेले आहे आणि आवश्यक असल्यासच ते वापरण्यास सांगितले आहे.

Related Stories

जिल्हाधिकारी कार्यालयात मिटिंगमध्ये हृदय विकाराच्या झटक्याने अव्वल कारकूनाचा मृत्यू

Kalyani Amanagi

व्हायरल क्लिप प्रकरणी चार माध्यम प्रतिनिधींची चौकशी करा : जारकिहोळी

Archana Banage

covid-19; आता नाकाद्वारे घ्या, करोना प्रतिबंधात्मक डोस

Rahul Gadkar

१० नौदल कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Archana Banage

कर्नाटकात शनिवारी २ हजारून अधिक रुग्णांची भर

Archana Banage

सलग तीन दिवसांच्या रुग्णवाढीनंतर पॉझिटिव्ह संख्येत घट

Archana Banage