Tarun Bharat

बेंगळूर अतिरेक्यांचे नाहीः जेडी (एस) नेते कुमारस्वामींनी खासदार सूर्या यांना फटकारलं

बेंगळूर/प्रतिनिधी

बेंगळूर “दहशतवादी कारवायांचे केंद्रबिंदू” बनले आहे असे वक्तव्य भाजपचे बेंगळूर दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी केले होते. खासदार सूर्या यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी मंगळवारी सूर्या यांनी केलेली टीका नसून शहराची बदनामी आहे.

कुमारस्वामी यांनी खासदार सूर्या यांनी माफी मागण्याची मागणी केली. खासदार सूर्या यांची भाजपाच्या युवा संघटनेचे अध्यक्षपदी नियुक्त केली आहे. कुमारस्वामी यांनी ट्विट करून म्हंटले हे की, “दहशतवादी संघटनांशी संबंध असलेले काही लोक डीजे हळ्ळी घटनेनंतर पकडले गेले. आमची टीका त्यांच्याविरोधातच झाली पाहिजे… कोट्यवधी लोकांचे घर नाही … बेंगळूर अतिरेक्यांचे नाही, ते आमचे आहे… बेंगळूर हा आपला अभिमान आहे.” असे म्हंटले आहे.

कुमारस्वामी यांनी भाजप नेत्याचे नाव न घेता त्यांनी “बेंगळूर दहशतवादी कारवायांचे केंद्र आहे, असे भाजपमधील काही भाष्यकर्त्यांनी केलेला अपमान म्हणजे शहराची बदनामी आहे.

भाजपच्या युवा संघटनेचे अध्यक्ष झाल्यानंतर एक दिवसानंतर, सूर्या यांनी अलिकडच्या काळात भारताच्या सिलिकॉन व्हॅलीच्या बेंगळूर अनेक दहशतवादी घटनेचे केंद्र बनले आहे. दहशतवादी गटांना दहशतवादी कारवायांसाठी शहर “इनक्युबेशन सेंटर” म्हणून वापरायचे आहे. बेंगळूर हे दहशतवादी कारवायांचे केंद्रबिंदू बनले आहेत, असा दावा भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी रविवारी केला आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शहरात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) कायमस्वरूपी विभाग स्थापन करण्याची विनंती केली होती.

Related Stories

बेंगळूर टर्फ येथे ऑनलाईन सट्टेबाजीस परवानगी; उच्च न्यायालयात याचिका

Archana Banage

बेंगळूर: कोरोना तपासणी अहवाल आयसीएमआर पोर्टलवर अपलोड न केल्याने चार प्रयोगशाळांना नोटीस

Archana Banage

कर्नाटक: आर. आर. नगर भागात कायदा – सुव्यवस्था धोक्यात : शिवकुमार

Archana Banage

मस्की पोटनिवडणूक : मतमोजणीत सहभाग घेतलेले १५ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

मोफत रेशन तांदळाचे प्रमाण 5 वरून 10 किलोपर्यंत वाढ

Amit Kulkarni

टिप्परची धडक बसून 54 बकऱ्या ठार

Tousif Mujawar