Tarun Bharat

बेंगळूर: आरपीएफने रेमडेसिवीर चोरीप्रकरणी ४ रेल्वे कर्मचाऱ्यांना केली अटक

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात रेमडेसिवीरच्या चोरीचे प्रकार सुरूच आहे. बेंगळूरमधील रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) शहरातील विभागीय रेल्वे रूग्णालयात काम करणाऱ्या चार रेल्वे कर्मचार्‍यांना अटक केल्याची माहिती दिली आहे.

आरपीएफ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेमडेसिवीर चोरी प्रकरणात अटक केलेल्या आरोपींमध्ये एक कंत्राटी कामगार आणि तीन गट सी/डी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अटकेनंतर सर्व आरोपींना कोर्टासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दक्षिण पश्चिम रेल्वेने त्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली असल्याची माहिती दिली. तसेच त्यांना निलंबित केले असून त्यांच्याविरूद्ध कठोर शिस्तभंगाची कारवाई केली गेली आहे.

Related Stories

मराठा समाजाला सरकारकडून दिवाळी भेट

Patil_p

बेंगळूर : म्युकर मायकोसिसच्या घटनांमध्ये वाढ

Archana Banage

कर्नाटकात कोविड रुग्णांना मदत करण्यासाठी ऑक्सीबस

Archana Banage

सेक्स स्कँडल: एसआयटी सर्व बाजूंनी चौकशी करून सत्य बाहेर आणेल : गृहमंत्री

Archana Banage

कर्नाटकात दोन महिन्यात ७४ टक्के मृत्यू, तर ७९ टक्के रुग्ण वाढ

Archana Banage

कर्नाटक: ऑक्सिजन पुरवठा कंपन्यांची यापुढे मनमानी चालणार नाही

Archana Banage
error: Content is protected !!