Tarun Bharat

बेंगळूर एफसीचा ईगल्सवर निसटता विजय

Advertisements

वृत्तसंस्था/ माले

रविवारी येथे झालेल्या एएफसी चषक फुटबॉल स्पर्धेतील प्ले ऑफ गटातील सामन्यात भारताच्या बेंगळूर एफसी संघाने मालदीवच्या ईगल्स क्लबचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला.

बेंगळूर एफसी आणि ईगल्स क्लब यांच्यातील ड गटातील प्ले ऑफ गटातील सामन्यात एकमेव विजयी गोल बेंगळूर एफसीच्या जयेश राणेने 26 व्या मिनिटाला नेंदविला. या स्पर्धेत ड गटातील एटीके मोहन बागानचा सामना बुधवारी होणार आहे. रविवारच्या सामन्यात ईगल्स क्लबने गोल करण्याच्या अनेक संधी वाया दवडल्या. या स्पर्धेत बेंगळूर एफसी संघाने प्राथमिक टप्यातील दुसऱया सामन्यात त्रिभुवन आर्मी एफसी संघाचा पराभव करत पुढील सामन्यासाठी मालदीवमध्ये आगमन केले होते.

Related Stories

कोंटावेट-फेरो यांच्यात अंतिम लढत

Patil_p

प्रीती-शिल्पाच्या संघात आज चुरस

Patil_p

स्कॉटिश महिला फुटबॉल स्पर्धेत बालादेवीचा गोल

Patil_p

अफगाण-आयर्लंड वनडे मालिका वेळापत्रकात फेरबदल

Patil_p

संदेश झिंगनची जर्सी निवृत्त करणार

Patil_p

जगातील सर्वात वयस्कर महिलेची टॉर्च रिलेतून माघार

Patil_p
error: Content is protected !!