Tarun Bharat

बेंगळूर: केआयएमएसमध्ये ऑक्सिजनचा अभाव, कोरोना रुग्णांना इतर रुग्णालयात हलवले

बेंगळूर/प्रतिनिधी


बेंगळूरच्या केम्पेगौडा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (केआयएमएस) ला सोमवारी रात्री ऑक्सिजन अभावी त्रासाचा सामना करावा लागला. त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आणि ऑक्सिजनच्या आधारावर असलेल्या ४७ रुग्णांना अन्य रुग्णालयात हलविण्यात आले.

ऑक्सिजनवर अवलंबून असणाऱ्या सर्व रूग्णांना विविध सरकारी व खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे, असे सांगून किम्स रुग्णालय व संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी द्रव ऑक्सिजन पुरवठ्याची कमतरता असल्याचे मान्य केलं आहे.

१७ ऑगस्टला मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडून लिक्विड ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे, ऑक्सिजनवर अवलंबून असणाऱ्या रूग्णांना त्रासाचा सामना करावा लागला. ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने रुग्णांची परिस्थिती बिघडण्याची शक्यता होती. म्हणून या परिस्थितीबद्दल सरकारी अधिकाऱ्यांना याविषयी माहिती दिली आणि इतर पुरवठादारांकडून द्रव ऑक्सिजनच्या व्यवस्थेसाठी विनंती केली. यावेळी ऑक्सिजनयुक्त सर्व रूग्णांना विविध सरकारी व खासगी रुग्णालयात हलविले, असे रुग्णालयाने दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

कर्नाटक सरकारचा पीएचसी आणि सीएचसी येथे कोविड लस उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न

Archana Banage

गेल्या 24 तासात राज्यात नवे 1,598 कोरोना रुग्ण

Amit Kulkarni

कर्नाटकात मंगळवारी कोरोनाचे ७,५७६ नवीन रुग्ण

Archana Banage

कर्नाटक मंत्रिमंडळ २६ एप्रिलच्या बैठकीत सर्वांसाठी मोफत लसीकरणाची मागणी करणार

Archana Banage

कर्नाटकात कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला

Archana Banage

कर्नाटक: भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी, तर काँग्रेसकडून सतीश जारकिहोळी निवडणूक लढणार

Archana Banage