Tarun Bharat

बेंगळूर : कोविड केअर सेंटरमधील सुमारे ६४ टक्के बेड रिक्त

बेंगळूर/प्रतिनिधी


कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध बेडपैकी ६० ते ६४ टक्के बेड वापरात आहेत. हीच परिस्थिती गेल्या १० दिवसांपासून कायम आहे. रविवारी, १० कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या २,६४३ खाटांपैकी १,४३३ बेड रिक्त आहेत.

शनिवारच्या आकडेवारीनुसार, रुग्णालये आणि हॉटेल्स यांच्या भागीदारीत उभारलेल्या ४२ खासगी केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या २६११खाटांपैकी केवळ ५९९ बेडवर रुग्ण होते. निवासी कल्याण संघटना आणि अपार्टमेंट कॉम्प्लेक्सनेही काही केंद्रे सुरू केली आहेत. याठिकाणी ३१ पैकी ३० बेड रिक्त आहेत.

सर्व परिस्थिती पाहता बृहत बेंगळूर महानगरपालिकेचे आयुक्त एन. मंजुनाथ प्रसाद यांनी सध्या विधानसभा क्षेत्र पातळीवर अतिरिक्त कोविड केअर सेंटर सुरू न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टास्क फोर्सचे प्रमुख राजेंद्रकुमार कटारिया यांनी अलीकडे मुख्यमंत्री बी.सी. येडियुरप्पा यांच्याशी झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा केली. गेल्या १० दिवसांपासून बेंगळूर शहरात दररोज सरासरी २००० नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. यापैकी ८० टक्के रुग्ण एकप्रकारचे रुग्ण आहेत आणि या ८०टक्के पैकी ४५ टक्के होम क्वारंटाईन पर्याय निवडतात तर जवळपास १५ टक्के रुग्ण खासगी केंद्रांमध्ये दाखल आहेत. याशिवाय केवळ १५ टक्के लोकांना शासकीय कोविड केअर सेंटर (सीसीसी) ची गरज आहे. कटारिया यांनी सरकारी सीसीसीमध्ये केवळ ३००-३५० लोक प्रवेश घेत आहेत आणि जवळजवळ दररोज तेवढ्याच रुग्णांना घरी सोडले जात आहे. असे ते म्हणले.

बीबीएमपी कमिशनर मंजुनाथ प्रसाद यांनी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात सीसीसीमध्ये रूग्णांची संख्या जसजशी वाढत जाईल तसतसे ते इतर केंद्रांचे विकेंद्रीकरण करण्याचे पर्याय शोधले जातील असे म्हंटले आहे.

Related Stories

जायंट्स मेनने स्मशानभूमीमध्ये साजरी केली दिवाळी

Patil_p

कर्नाटक: वन्यजीव प्राण्यांची तस्करी करणारी टोळी गजाआड

Archana Banage

गुंजीत आखेर स्वयंघोषित सीलडाऊन, गावातील सर्वच रस्ते बंद

Patil_p

शैक्षणिक सातत्यासाठी अकरावी विद्यार्थ्यांना असायन्मेंट

Amit Kulkarni

पतंजली योग समितीतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

Amit Kulkarni

बेळगुंदी भागातील बससेवा सुरळीत करण्याची मागणी

Amit Kulkarni