Tarun Bharat

बेंगळूर: जनता खोट्या आश्वासनांना फसणार नाही

बेंगळूर/प्रतिनिधी

विरोधी पक्षनेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा खोटे बोलण्यात फार अनुभवी आहेत. मोदी सरकारमधील मंत्री निर्मला सीतारमण यांच्यामार्फत मतदारांना मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन दिले जाते. तर येडियुरप्पा यांनी सीराला शिकारपूरप्रमाणे विकसित करण्याचे आश्वासन दिले आहे.

येथील मतदार सुज्ञ असून ते त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. सरकार कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे. येडियुरप्पा सरकारने पीपीई किट खरेदीच्या नावाखाली दोन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केला. दरम्यान मोदी यांचे म्हणणे आहे की त्यांचे सरकार भ्रष्टाचार अजिबात सहन करणार नाही. त्यामळे त्यांची आणि येडियुरपांची संपत्ती कशी वाढली याचे उत्तर मोदींना द्यावे लागेल.

पोलिसांनी दबावाखाली काम करू नये. राजराजेश्वरी नगर परिसरातील पोलीस कर्मचारी सत्ताधारी भाजप नेत्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे. येत्या काही दिवसांत अशा प्रकारची वागणूक या पोलीस कर्मचार्‍यांना महागात पडेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. कोणाच्याही दबावाखाली न जाता पोलीस कर्मचार्‍यांनी आपले कर्तव्य बजावले पाहिजे. राजराजेश्वरीनगर येथील प्रचारसभेत भाग घेताना त्यांनी भाजपचे उमेदवार मुनिरत्न यांना लक्ष्य केले, काही लोक या भागातील मतदारांना धमकावून निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहत आहेत. परंतु या भागातील सावध मतदार यावेळी मुनिरत्नसंदर्भात योग्य निर्णय घेतील. या प्रदेशाच्या विकासात कॉंग्रेसचे मोठे योगदान असल्याचे ते म्हणले.

विकासाच्या जोरावर या भागातील लोकांनी काँग्रेस उमेदवारास निवडून दिले होते. आज या विकासाच्या जोरावर मुनिरत्न हे भाजपचे उमेदवार म्हणून हक्क सांगत आहेत. परंतु येथील जनता नेहमी काँग्रेसच्या सोबत राहिली आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवाराचा विजय निश्चित आहे असे ते म्हणाले.

Related Stories

वडगावमध्ये स्थापन होणार किडवाई कॅन्सर हॉस्पिटलचे केंद्र

Amit Kulkarni

येडियुराप्पांना अभय मिळण्याचे संकेत

Patil_p

delta plus variant: कर्नाटकने त्वरित उपाययोजना कराव्यात, केंद्राच्या सूचना

Archana Banage

दिलासादायक! कर्नाटकात सक्रिय रुग्ण संख्येत घट

Archana Banage

बेंगळूर: बीबीएमपी निवडणुका पुढील वर्षी होणार ?

Archana Banage

हुतात्म्यांच्या कुटुंबियांना दरमहा २० हजार रुपये भत्ता

Rohit Salunke