Tarun Bharat

बेंगळूर: पोलिसांनी ५४ दिवसात ४१,८३२ वाहने केली जप्त

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर राज्य सरकारने कडक नियमांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. दरम्यान बेंगळूरमध्ये ५४ दिवसात (१० एप्रिल ते ३ जून) कर्फ्यू आणि लॉकडाऊन उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ४१,८३२ वाहने जप्त केली असून दिवसा सरासरी ७७४ वाहने जप्त केली आहेत. दरम्यान गेल्या वर्षी, कोरोना लॉकडाऊन दरम्यान २४ मार्च ते ३० एप्रिल आणि १४ जुलै ते २२ जुलै या दोन टप्प्यात दिवसाला सरासरी १,०७५ वाहने जप्त केली होती.

दरम्यान राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लागू केला. यासाठी स्वतंत्र नियमावलीही जाहीर केली. दरम्यान राज्यात कोरोनाचे कडक निर्बंध असतानाही अनेक लोक घराबाहेर पडत होते. अशा विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर पोलीस दंडात्मक कारवाई करत होते. दरम्यन बेंगळूर शहरी जिल्ह्यात विनाकारण फिरणाऱ्या अनेक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत अनेक वाहने जप्त केली आहेत. पोलिसांनी ३७,३६२ दुचाकी, २०३६ तीन चाकी आणि २४३४ चारचाकी वाहनचालकांवर कारवाई केली आहे. मागील वर्षी ४६,२३७ दुचाकी, १२०० तीन चाकी आणि २०७७ चारचाकी वाहने जप्त केली होती.

राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी सरकारने पुन्हा लॉकडाऊन वाढविल्याने हे निर्बंध १४ जूनपर्यंत कायम राहणार आहेत. दरम्यान, लसीकरण आणि किराणा सामान खरेदी अशा विविध कारणांसाठी वाहनांच्या हालचालींना परवानगी देण्यात आली आहे.

“बरेच लोक लॉकडाऊनचा गैरवापर करीत आहेत आणि आम्ही त्यांची वाहने जप्त करतो.दरम्यान “दररोज पोलीस कर्मचारी आणि वाहनचालक यांच्यात जोरदार वाद-विवाद होत असतात, जे पहिल्या लॉकडाऊन दरम्यान नव्हते.” असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Related Stories

मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी अपेक्स बँकेकडून 5 कोटींची मदत

Amit Kulkarni

गोकाक धबधब्याच्या ठिकाणी बॅरिकेड लावले

Rohit Salunke

कर्नाटकचा मुंबईवर हक्क हास्यास्पद

Archana Banage

अभिनेत्री संजनाला ३० सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

Archana Banage

कर्नाटकात मंगळवारी ९,८०८ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

Archana Banage

शुल्क कपातीवरून खासगी शाळांचा एल्गार

Amit Kulkarni