Tarun Bharat

बेंगळूर पोलीस प्रमुखांनी १५ ऑगस्ट पर्यंत कर्फ्यू वाढविला

बेंगळूर/प्रतिनिधी

बेंगळूर शहरात सोशल मीडिया पोस्टवरून हिंसाचार झाला. यावेळी जमावाने पोलीस स्टेशन आणि काँग्रेस आमदाराच्या घरावर हल्ला केला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी यावेळी गोरीबार केला. या गोळीबारात तिघांचा मृयू झाला आहे. या घटनेनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पोलीस आयुक्तालयाने डीजे हळ्ळी आणि केजी हळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 144 च्या फौजदारी प्रक्रियेची (सीआरपीसी) अंमलबजावणी १५ ऑगस्ट पर्यंत सकाळी 6 वाजेपर्यंत वाढवली आहे.

एका आदेशानुसार बुधवारी रात्री बेंगळूरचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी कर्फ्यू वाढविला आहे. बेंगळूर पोलिसांच्या माहितीनुसार, डीजे हळ्ळी आणि केजी हळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू होता.

Related Stories

भाग्यनगर येथील ती जागा स्मशानभूमीसाठी राखीव ठेवा

Patil_p

अथणी, हुक्केरी येथील दोन महिलांचा कोरोनामुळे बळी

Patil_p

महांतेशनगर येथे शिक्षण शिबिर उत्साहात

Omkar B

शेवटच्या श्वासापर्यंत सामान्य जनतेची सेवा करणार

Patil_p

संगोळ्ळी रायण्णा सैनिक शाळा लवकरच सेवेत

Amit Kulkarni

कर्नाटक: खासगी शाळांना फी कमी करण्याचा प्रस्ताव

Archana Banage