Tarun Bharat

बेंगळूर : महिलेला ऑनलाईन ऑक्सिजन सिलेंडर शोधणे पडले महागात

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात बरेच रुग्ण कोरोनावर घरी अलग राहून उपचार घेत आहे. बेंगळूर, कोदिहळ्ळी येथे घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासल्यानंतर घरातील एका महिलेला ऑनलाईन ऑक्सिजन शोधणे महागात पडले. या महिलेला ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या नावाखाली एका व्यक्तीने १.६२ लाखाला गंडा घातला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोदिहळ्ळी येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील दोन सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि घरी ते अलगीकरणात आहेत. त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता होती. त्यानतर ही महिला ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा करणाऱ्यांविषयी इंटरनेटवर माहिती शोधत होती. मग तिने एका व्यक्तीला ऑक्सिजन पुरवठा करण्यास सांगितले.

दरम्यान या युवकाने महिलेला १.६२ लाख रूपये जमा करण्यास सांगितले व वाहनाची परवानगी व इतर कर भरण्यास सांगितले आणि नंतर ही रक्कम परत केली जाईल असे सांगितले. महिलेने पैसे जमा केले पण त्यांना ऑक्सिजन मिळाला नाही. काही वेळानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे समजताच तिने पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी महिलेच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करत तपास सुरु ठेवला आहे.

Related Stories

कर्नाटकचा मुंबईवर हक्क हास्यास्पद

Archana Banage

“मला २५०० कोटींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर”; भाजपच्या माजी मंत्र्याचे वक्तव्य

Archana Banage

आमदार ईश्वर खंडे यांना उच्च न्यायालयाचा 5 लाखांचा दंड

Omkar B

कर्नाटकातील शेतकरी आज ३ तास रेल रोको करणार

Archana Banage

मुख्यमंत्र्यांनी केरळमध्ये रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाला सतर्क राहण्याचे दिले आदेश

Archana Banage

कर्नाटक: देवेगौडा जाहीर सभेत भावूक, पक्षाला जिवंत ठेवण्याचे आवाहन

Archana Banage