Tarun Bharat

बेंगळूर मेट्रो शनिवार-रविवार बंद राहणार

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने कठोर पावले उचकली आहेत. दरम्यान राज्यात शुक्रवारी रात्री ९ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत विकेंड लॉकडाऊन असणार आहे. तर राज्यात नाईट कर्फ्यू देखील लागू केला आहे. ४ मे पर्यंत विकेंड लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे सर्व स्थरातून या आदेशाचे पालन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत बेंगळूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीएमआरसीएल) शनिवारी व रविवारी कोणत्याही गाड्या चालविणार नसल्याचे जाहीर केले.

तथापि, सोमवार ते शुक्रवार (२६ एप्रिल ते ४ मे दरम्यान) आठवड्याच्या दिवसात गाड्या नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजता सुरू होतील. तथापि, नागासंद्र, सिल्क इन्स्टिट्यूट संस्था, म्हैसूर रोड आणि बैयप्पनहळ्ळी स्थानकांसारख्या टर्मिनल स्थानकांवरील शेवटच्या सेवा संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होतील.

आठवड्याच्या दिवसात दररोज शेवटच्या सेवेदरम्यान कार्यरत सर्व गाड्या, मॅजेस्टिकच्या केम्पेगौदा मेट्रो स्टेशनवरही कनेक्शन गाड्या असतील, असे बीएमआरसीएलने स्पष्ट केले आहे.

Related Stories

तुमकूरच्या सिरा मतदारसंघातून डॉ. राजेश गौडा यांना तिकीट

Patil_p

गृहमंत्र्यांच्या निवासस्थानीच कोविड सेंटर

Amit Kulkarni

कर्नाटक: राज्यात सलग तिसऱ्या दिवशी बाधितांच्या संख्येत वाढ

Abhijeet Shinde

कर्नाटक: द्वितीय पीयू परीक्षा पुढे ढकलली

Abhijeet Shinde

ऑक्सिजनविना 24 रुग्णांचा मृत्यू

Amit Kulkarni

कर्नाटक: कोविड लसीकरण ड्राय रन सर्व जिल्ह्यात सुरू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!