Tarun Bharat

बेंगळूर: लॉकडाऊनची मागणी करणाऱ्या आयुक्तांची बदली

बेंगळूर /प्रतिनिधी

कर्नाटकात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. यापाटोपाठ राजधानीतही कोरोना रुग्ण वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने बीबीएमपी आयुक्त अनिल कुमार यांनी लॉक डाऊन वाढवण्याची मागणी केली होती. यांनतर शनिवारी बृहद बेंगळूर महानगरपालिका (बीबीएमपी) आयुक्त अनिल कुमार यांची सरकारने बदली केली आहे. त्यांच्या जागी आयुक्तपदी महसूल विभागाचे मुख्य सचिव एन. मंजुनाथ प्रसाद यांची नियुक्ती केली आहे. प्रसाद यांनी यापूर्वी बीबीएमपी आयुक्तपदाचा कार्यभारही सांभाळला आहे.

अनिल कुमार यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आणखी एक आठवड्यासाठी बेंगळूरमध्ये लॉकडाऊन लागू करावा असे म्हटले होते, यांनतर सरकारने स्पष्टीकरण देत लॉकडाऊन वाढविण्याचा सरकारचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी अधिकाऱ्यांसमवेत कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला होता आणि कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानांना सामोरे योग्य त्या उपपययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या.

Related Stories

जिल्हाधिकारी-पोलीस आयुक्तांनी स्पष्टीकरण द्यावे

Amit Kulkarni

कर्मचारी व कामगारांसाठी नेत्र चिकित्सा शिबिर

Amit Kulkarni

लोकमान्य सोसायटीच्या विविध ठेव योजनांच्या गुंतवणुकीवर सुवर्णसंधी

Amit Kulkarni

शहरातील मंदिरे दर्शनासाठी खुली

Amit Kulkarni

रंगरंगोटी कशाला? पानाच्या पिचकाऱया भिंतीवर!

Amit Kulkarni

आयटीआय परीक्षेला चार वर्षांनंतर प्रारंभ

Amit Kulkarni