Tarun Bharat

बेंगळूर ‘लॉकडाऊन’बाबत आज निर्णय

Advertisements

प्रतिनिधी / बेंगळूर

राजधानी बेंगळूरमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात संपूर्ण लॉकडाऊन करण्याबाबत दबाव वाढत असल्यामुळे बेंगळूर लॉकडाऊन करण्याबाबत आज (सोमवारी) निर्णय होणार आहे. शहरात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर नियमांबाबत चर्चा करण्यासाठी महसूलमंत्री आर. अशोक यांच्या नेतृत्वाखाली बेंगळुरातील सर्व लोकप्रतिनिधींची सोमवारी विधानसौध येथे बैठक होणार आहे. एखादवेळेस लॉकडाऊनचा निर्णय न झाल्यास रात्रीचा कर्फ्यू कायम ठेवणे. त्याचबरोबर विकेंड लॉकडाऊन आणि गर्दी होणारी सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यासह अनेक कठोर निर्णय बैठकीत होण्याची शक्यता आहे.

अनावश्यक बाहेर फिरण्यावर बंदी घालण्यासाठी शहरात संचारबंदी जारी करणे, आवश्यक सेवा वगळता गर्दी होणारी ठिकाणे म्हणजे हॉटेल, बार आणि पब बंद करण्याबाबतही बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते. बाजारपेठ, दुकाने, व्यापारासाठी वेळ ठरविण्याची शक्यता आहे. राज्यात नोंद होणाऱया कोरोनाबाधितांच्या संख्येपैकी 75 टक्के रुग्ण बेंगळुरातच आढळून येत आहेत. त्यामुळे बेंगळुरातील परिस्थिती खूपच वाईट असल्याने शहरात कठोर नियम लागू करणे अनिवार्य आहे. कोरोनावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेले मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या सूचनेनुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, असे मंत्री आर. अशोक यांनी सांगितले.

सर्वांशी चर्चा करूनच कठोर नियम

सोमवारी दुपारी 3 वाजता विधानसौधमध्ये बेंगळुरातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून शहरातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विकेंड लॉकडाऊन, रात्रीच्या कर्फ्युतील वेळेत बदल करत रात्री 10 ऐवजी 8 करण्यावरही चर्चा होऊ शकते. बेंगळुरात दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे सर्वांशी चर्चा करून कठोर नियम लागू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री येडियुराप्पा रुग्णालयातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभेत सहभागी होण्याची शक्यता आहे.

मंगळवारपासून राज्यात कठोर नियम?

बेंगळूरसह राज्यात कठोर नियम जारी करण्याबाबत मुख्यमंत्री 20 एप्रिल रोजी निर्णय घेणार होते. पण, त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांच्या अनुपस्थितीत मंत्री आर. अशोक बैठक घेणार आहेत. बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असून मंगळवारपासून राज्यात कठोर नियम लागू होण्याची शक्यता आहे. या नियमांमध्ये विकेंड लॉकडाऊन, हॉटेल, बार, पब बंद करणे आदी विषय असल्याचे समजते.

Related Stories

कर्नाटक : के-सीईटी परीक्षा ७ आणि ८ जुलै रोजी

Archana Banage

कर्नाटकमध्ये गेल्या सात दिवसात १२ हजार रुग्णांची नोंद

Archana Banage

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचा लोगो १ एप्रिल रोजी होणार रिलीज

Abhijeet Khandekar

केरळमधील २०० विद्यार्थ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले

Archana Banage

विजापूर जिल्ह्यात प्रवेशासाठी कर्नाटकची नाकाबंदी

Archana Banage

शुल्क भरले नाही म्हणून ऑनलाईन वर्ग बंद करू नका!

Patil_p
error: Content is protected !!