Tarun Bharat

बेंगळूर : शाळा वेळेचे पालन करत नाहीत

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

शिक्षण विभागाच्या सूचना अजूनही काही शाळा पाळत नाहीत. खासगी शाळा ऑनलाईन शिक्षणासाठी सरकारच्या स्क्रीनटाईमचे उल्लंघन करत आहेत. दीर्घ कालावधीपासून बर्‍याच विद्यार्थ्यांसमोर येत असलेल्या अडचणी लक्षात घेता आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा इशारा शिक्षणमंत्र्यांनी दिला आहे.

सार्वजनिक शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन शिक्षणासंबंधी मार्गदर्शक सूचना जारी करूनही अनेक शाळा नियमांचे पालन करीत नाहीत. यासंदर्भात विभागाकडे कित्येक तक्रारीही आल्या आहेत. ऑनलाईन क्लासेसवरील तज्ज्ञ समितीच्या अहवालाच्या आधारे शिक्षण विभागाने पाचव्या इयत्तेपर्यंतच्या मुलांसाठी थेट सत्राचा कालावधी ३० मिनिट तर उर्वरित वर्गासाठी ४५ मिनिटांचा मर्यादित केला आहे. थेट आणि पूर्व-रेकॉर्ड केलेल्या वर्गाची परवानगी घेऊन, काही मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली गेली आहेत

Related Stories

कर्नाटक: “पंचायत कर्मचारी आता कोरोना वॉरियर्स”

Abhijeet Shinde

कर्नाटकमध्ये मागील तासात १ हजार ६६९ नवीन रुग्ण, तर २२ मृत्यू

Abhijeet Shinde

कर्नाटकात एका दिवसात ८,६५५ जणांना कोरोना संसर्ग

Abhijeet Shinde

माजी मंत्री यु. टी. खादर यांच्या कारला अपघात

Amit Kulkarni

राज्यात चाचण्यांची संख्या वाढवा

Abhijeet Shinde

राज्य सरकार महिन्याच्या अखेरीस पहिली ते आठवीचे वर्ग सुरु करण्याचा घेणार निर्णय

Abhijeet Shinde
error: Content is protected !!