Tarun Bharat

बेंगळूर: सहाय्य्क कार्यकारी अभियंत्याच्या निवासस्थानी छापा

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिका्यांनी सहाय्यक कार्यकारी अभियंता, बीबीएमपी, ब्रोकर आणि टीडीआर अर्जदाराच्या घरावर एकाच वेळी छापा टाकला. यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी इथल्या म्हैसूर सिटी कॉर्पोरेशनशी संबंधित अधिकाऱ्याच्या घरावरही छापा टाकला. बेंगळूर आणि म्हैसूर याठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

बेंगळुरूमध्ये, एचएसआर लेआउट येथील एईई एम. एन. देवराजू , कन्नरू गावात राहणार दलाल के. पी. नागराज, येरप्पानाहळ्ळी येथील एक दलाल बी. नागराजू, जमीनदार आणि टीडीआर अर्जदार सुब्बा राव यांच्या घरी छापे टाकण्यात आले.

म्हैसूरमध्ये एसीबीच्या अधिका्यांनी शहरातील म्हैसूर सिटी कॉर्पोरेशन (एमसीसी) झोन-६ झोनल अधिकारी नागराज यांच्या निवासस्थानी छापा टाकला. यांच्यावर बेकायदेशीर काम करत संपत्ती जमावल्याचा आरोप आहे.

Related Stories

बेंगळूर ट्राफिक पोलिसांनी २ तासात जमा केला २९.५ लाख दंड

Abhijeet Shinde

शिवमोग्यात कासवाची तस्करी करणारी टोळी गजाआड

Abhijeet Shinde

मध्यान्ह भोजन योजना: कर्नाटक हायकोर्टाकडून सरकारला चांगल्या कृती आराखड्याबाबत विचारणा

Abhijeet Shinde

केंद्राकडून ऑक्सिजन मिळण्याचा मार्ग मोकळा

Amit Kulkarni

भाजपने कुरुबा समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करावे

Abhijeet Shinde

कर्नाटकमध्ये दुसर्‍या डोससाठी ७० टक्के कोविशील्ड लस वापरली जाणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!