Tarun Bharat

बेंगळूर: सीसीबीच्या ताब्यात असलेल्या हॅकरने ३० वेबसाइट हॅक केल्याची दिली कबुली

बेंगळूर/प्रतिनिधी

वेबसाइट्स हॅकिंग करणार्‍या आणि डार्क वेबचा विदेशातून ड्रग्ज घेण्यासाठी वापरत असलेल्या एका २५ वर्षांच्या सॉफ्टवेअर अभियंत्याने केंद्रीय गुन्हे शाखेकडे आपण ३० वेबसाईट हॅक केल्या असल्याची कबुली दिली आहे.

आरोपी श्रीकृष्णाने आतापर्यंत ३० वेबसाइट हॅक केल्याची कबुली दिली आहे, मुख्यत: बिटकॉइन एक्सचेंज, पोकर आणि अन्य गेमिंग साइट त्याने हॅक केल्या आहेत. दरम्यान तांत्रिक पुरावा गोळा करणे आणि त्याचे विश्लेषण यासह पुढील चौकशी चालू आहे, असे गुन्हे शाखेचे सहआयुक्त संदीप पाटील यांनी सांगितले. तसेच आरोपी १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे, अशी माहिती सीसीबीने दिली.

Related Stories

राज्यात दिवसभरात 22,578 नवे रुग्ण

Amit Kulkarni

‘खासगी’तील 50 टक्के बेड्स ताब्यात घ्या : शोभा करंदलाजे

Amit Kulkarni

विजेच्या धक्क्याने दोघा शेतकऱयांचा मृत्यू

Tousif Mujawar

राज्यातील 10 शहरी ‘स्थानिक स्वराज्य’साठी शांततेत मतदान

Amit Kulkarni

सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करणे अशक्य

Patil_p

कर्नाटक: जागतिक लस खरेदी निविदेला २ कंपन्यांचा प्रतिसाद

Archana Banage