Tarun Bharat

बेंगळूर: सीसीबीने माजी मंत्र्याच्या मुलग्याला मदत केल्याप्रकरणी हेड कॉन्स्टेबलला अटक

बेंगळूर/प्रतिनिधी

एका माजी कॉन्स्टेबलला माजी मंत्र्याच्या मुलासह तीन आरोपींना आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटमध्ये गुंतल्याच्या आरोपाखाली मदत केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.

सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप पाटील यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार सदाशिवनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणार हेड कॉन्स्टेबल प्रभाकर यांना सीसीबीने आरोपी सुनीश, हेमंत आणि इतरांना मदत केल्याप्रकरणी अटक केली आहे.

प्रभाकरला १२ नोव्हेंबरला निलंबित करण्यात आले होते आणि त्यानंतर ते अटकेपासून बचावले होते. ९ नोव्हेंबर रोजी गोव्यातील ड्रग्स प्रकरणात माजी मंत्री रुद्रप्पा लमाणी यांचा मुलगा दर्शन लमाणी यांच्यासह तीन जणांची चौकशी केल्यानंतर प्रभाकर यांची भूमिका उघडकीस आली होती, असे सीसीबीने पूर्वी सांगितले होते.

यापूर्वी प्रभाकरचा या प्रकरणात सहभाग असल्याचे बेंगळूर शहर पोलीस आयुक्त कमल पंत यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यांनी कर्तव्यदक्षतेत कसूर केल्याबद्दल निलंबनाचे आदेश दिले. चौकशी पथकाच्या म्हणण्यानुसार, चौकशी दरम्यान कॉल रेकॉर्ड आणि इतर माहिती गोळा केली गेली होती, की प्रभाकर आरोपी फरार असतांना पोलीस पथकाची ठिकाणे शोधत होता.

Related Stories

तरुण भारत इफेक्ट : किल्ला तलावा समोरील बस थांब्याचे’ते’धोकादायक शेड हटवले

Tousif Mujawar

भारतात कोरोनाची दुसरी लाट : के. सुधाकर

Archana Banage

मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना मोठा दिलासा

Amit Kulkarni

तुमच्या तक्रारी दिल्लीत मांडा : असंतुष्ट आमदारांना मुख्यमंत्र्यांचा इशारा

Archana Banage

बेंगळूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ

Archana Banage

रवी चेन्नण्णावर यांच्यासह12 आयपीएस अधिकाऱयांच्या बदल्या

Amit Kulkarni