Tarun Bharat

बेंगळूर हिंसाचार: पोलिसांनी जलद कारवाई केली गेली असती तर घटना टळली असती : सिद्धरामय्या

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

बेंगळूर येथील डी.जे. हळ्ळी पोलीस स्टेशन आणि आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या निवास्थानी जमावाने हल्ला करत जाळपोळ केली होती. हा सर्व प्रकार एका सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे घडला होता. आज कर्नाटकचे विरोधीपक्षनेते सिद्धरामय्या यांनी डी.जे. हळ्ळी पोलीस स्टेशन आणि आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांचे निवासस्थान आणि पूर्व बेंगळूरमधील इतर ठिकाणी हिंसाचार आणि पोलिसांच्या गोळीबाराची घटना घडली त्या ठिकाणी भेट दिली.

यावेळी कर्नाटकचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी पोलिसांनी त्वरित कारवाई केली असती तर ही घटना टाळता आली असती. पोलिसांनी नवीन या व्यक्ती विरुद्ध कारवाई, केली असती तर हा प्रकार घडला नसता असं त्यांनी म्हंटल आहे.

सिद्धरामय्या यांनी डीजे हळ्ळीची घटना घडली तेव्हा माझ्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. आता मी पूर्ण बरे झाल्यानंतर घटनास्थळी भेट देत असल्याचे म्हंटले आहे. सिद्धरामय्या यांनी हिंसाचाराच्या कृत्याचा निषेध करत हिंसाचारात सहभागी असलेल्या सर्वांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Related Stories

कोरोना परिस्थितीमुळे परिवहनला 4000 कोटींचा फटका

Patil_p

पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसची राज्यव्यापी सायकल रॅली

Amit Kulkarni

कर्नाटक हायकोर्टाच्या ‘त्या’ आदेशाविरूद्ध उत्तर प्रदेश सरकार सर्वोच्च न्यायालयात

Abhijeet Shinde

दहावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

Amit Kulkarni

कर्नाटक हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस

Abhijeet Shinde

जिल्ह्यातील प्रभारी मंत्री बदलणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!