Tarun Bharat

बेकायदा धारदार शस्त्रांसह साताऱयातील एकास अटक

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरानजिक शाहूपुरी ते आंबेदरे रस्त्यावर असलेल्या दिव्यनगरी येथे गोवर्धन कॉलनी चौकात दि. 29 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एका पोत्यात चार तलवारी व सात कोयते अशी 11 घातक हत्यारे जवळ बाळगून अंधारात लपलेल्या सचिन बाळू चव्हाण (वय 28, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) याला जिल्हा विशेष शाखा व दहशतवाद विरोधी पथकाने जेरबंद केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जिल्हय़ात बेकायदा शस्त्रांवर कारवाईचे आदेश वरिष्ठ अधिकाऱयांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेचे दहशतवाद विरोधी पथक दि. 29 रोजी सातारा शहर परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी हे पथक दिव्यनगरी ते कोंडवे रस्त्यावर असलेल्या गोवर्धन कॉलनी परिसरात गेले. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती पोलीस गाडी व पथकाला पाहून तिथे नव्याने सुरु असलेल्या बांधकामाच्या इमारतीत भिंतीच्या मागे लपून बसलेला आढळून आला.

पथकाला त्या अनोळखीच्या हालचालींचा संशय आल्याने त्याच्याकडे जावून चौकशी केली. मात्र तो काही बोलला नाही. मात्र त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या पोत्यात तब्बल चार धारदार तलवारी, सात कोयते असा एकूण 18 हजार 500 रुपये किंमतीची घातक शस्त्रs आढळून आली. सचिन बाळू चव्हाण असे ताब्यात घेतलेल्याचे नाव असून त्याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यावर त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या कारवाईत पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील व पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी विभुते, प्रताप भोसले, पोलीस नाईक सागर भोसले, कॉन्स्टेबल सुमीत मोरे, केतन जाधव, राहूल वायदंडे यांनी सहभाग घेतला होता.

एवढी शस्त्रs तो कोणाला देणार होता

दिव्यनगरी, कोंडवे परिसरात नव्याने होणाऱया बांधकामुळे हा परिसर वाढत आहे. या परिसरात अनेक विघातक कारवाया होत असतात. त्यामुळे या परिसरात रात्रगस्त वाढवण्याची गरज आहे. पेट्रोलिंग करतानाच घातक शस्त्रांसह आकाशवाणी झोपडपट्टीतील हा संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला असून तो एवढी शस्त्रs नेमकी कोणाला देणार होता किंवा अशी शस्त्रs विक्री करणारी टोळी सक्रीय आहे का ? या प्रश्नाची उत्तरे तपासात समोर येतील, असे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी सांगितले.

Related Stories

मान्सूनचा गोवा आणि दक्षिण कोकणात प्रवेश

Rohit Salunke

आदित्य ठाकरे महिनाअखेरीस कोल्हापूर दौऱ्यावर

Archana Banage

डॉ. विजय थोरात आज स्वीकारणार पदभार

Patil_p

दुकानदारांनी मास्कचा वापर न केल्यास दुकानावर कारवाई : जिल्हाधिकारी दौलत देसाई

Archana Banage

प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला जिल्हाधिकायांनी दिली मान्यता

Patil_p

थकीत एफआरपीप्रश्नी 5 रोजी साखर आयुक्तांना घेराव

Amit Kulkarni