Tarun Bharat

बेकायदा पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक

इस्लामपूर / प्रतिनिधी

देशी बनावटीचे पिस्टल बाळगल्या प्रकरणी सनी उर्फ गणेश सुनिल शिंदे (25, रा. ओगलेवाडी, ता. कराड) याला इस्लामपूर पोलीसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून 41 हजार 100 रुपये किंमतीचे पिस्टल, एक जीवंत काडतूस, एक मॅकझीन हस्तगत केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, दि. 2 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिंदे हा पिस्टल बाळगून वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्रगड येथील खिंडीमधील रस्त्याकडेच्या एसटी पिकअप शेडमध्ये थांबला असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक शशीकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण साळुंखे, हवलदार गणेश मोहिते, उत्तम माळी, गणेश शेळके, अमोल सावंत, सुरज जगदाळे, उमेश शेटे, योगेश जाधव यांनी या परिसरात सापळा लावला.

मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शिंदे हा पिकअप शेडमध्ये उभा असलेला दिसून आला. पोलीसांनी त्यास ताब्यात घेवून झडती घेतली असता, त्याच्या पॅंटच्या डाव्या बाजूच्या खिशात एक लोखंडी मॅकझीन व जीवंत काडतूस मिळून आले. दरम्यान त्याने देशीबनावटीचे पिस्टल काढून दिले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश शेळके यांनी फिर्याद दिली. आरोपी गणेश शिंदे याच्या विरुध्द भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 25 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर कोठडी देण्यात आली असून हे पिस्टल त्याने कोणाकडून आणले, याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

सांगली : कोरोनाचा विळखा हळूहळू सैल होतोय

Archana Banage

मिरज शहर पोलीस ठाण्यातच तरुणाने घेतले पेटवून

Archana Banage

मलिकांवर ईडी कारवाई करणार याची पुसटशी कल्पना होती : शरद पवार

Archana Banage

शोपियांमध्ये सुरक्षा दल- दहशतवाद्यांमध्ये चकमक

datta jadhav

मराठा आरक्षणाबाबत उदयनराजे भोसले यांच्याशी सांगलीतील कार्यकर्त्यांची चर्चा

Archana Banage

महाराष्ट्रात 25 हजार कंपन्या सुरू, साडेसहा लाख कामगार परतले कामावर

Tousif Mujawar