Tarun Bharat

बेकायदा बांधकामप्रकरणी कारणे दाखवा नोटीस

Advertisements

पोंबुर्पा वळावली पंचायतीची कारवाई

प्रतिनिधी / पर्वरी

पंचायत कार्यालयाकडून कायदेशीर मान्यता न घेता आणि सीआरझेड खात्याचे नियम धाब्यावर बसवून भाटात-एकोशी येथील खाडीच्या किनाऱयावर पत्र्याची शेड उभारणाऱया व सुलभ शौचालय बांधणाऱया मालकास पोंबुर्पा वाळवली पंचायतीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सव्हे नं. 294/1 मधील जागेत मांडवी नदीच्या खाडिच्या किनाऱयावर बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी पात्रिस कार्दोव व इतरांनी पोंबुर्पा वळवळी पंचायतीत लेखी तक्रार केली होती. त्यानंतर पंचायत सचिवांनी बांधकाम करणाऱया क्रुज मास्कारेन्हस (रा. कळंगुट) यांना 16 मे रोजी नोटीस पाठवून कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यासंबंधी मास्कारेन्हस यांनी पंचायत कार्यालयाकडे कोणताच पत्रव्यवहार केला नाही. दरम्यान 31 मे रोजी झालेल्या पंचायत मंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन संबंधित बांधकामावर कारवाई करण्याचा ठराव संमत करण्यात आला होता, अशी माहिती सरपंचांनी दिली.

पंचायत कार्यालयाशी मास्कारेन्हस यांनी पत्रव्यवहार न केल्यामुळे पंचायत सचिवांनी 12 जून रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एकोशी गावच्या किनारपट्टीवर ठिकठिकाणी मच्छीमारीच्या बोटी नांगरण्यात आल्या असून त्यामध्ये मास्कारेन्हस यांच्याही बोटी आहेत. या बोटीवर बिगरगोमंतकीय खलाशी मोठया संख्येने असून कोरोना महामारीमुळे गावातील ग्रामस्थांनी आक्षेप घेऊन या बोटी इतरत्र हलविण्याची सूचना बोट मालकांना दिली आहे.

Related Stories

कर्णबधिरांच्या इंटरप्रेटरचा प्रश्न सुटेना

Patil_p

ऊस उत्पादकांच्या सांगेतील धरणे आंदोलनास प्रारंभ

Patil_p

फातोर्डा भाजपच्या प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांचा उत्तम प्रतिसाद

Patil_p

शेवटच्या स्थानावरील ओडिशाचा सामना आज एटीकेशी

Amit Kulkarni

लोकप्रतिनिधींनी फलकांचे शुल्क भरून आदर्श ठेवावा ः शॅडो कौन्सिल

Patil_p

कोरोनाच्या सावटाखालीही गणेशोत्सवाचा उत्साह

Patil_p
error: Content is protected !!