Tarun Bharat

बेकायदा मासेविक्रीवर आजपासून मडगाव नगरपालिकेची कारवाई

Advertisements

प्रतिनिधी/ मडगाव

मडगाव पालिका आज सोमवारपासून रस्त्याच्या कडेला बसून होणाऱया मासळीच्या अवैध विक्रीविरुद्ध मोहीम सुरू करणार आहे. विपेत्यांनी बेकायदा रस्त्यावर अतिक्रमण करणे स्वतःहून टाळ?ावे अन्यथा पालिकेला कारवाईचा बडग?ा उचलणे भाग पडेल, असा इशारा मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिला.                                                  कारवाईत मासळी जप्त करणे भाग पडल्यास निवारा गृह आणि वृद्धाश्रम यांना जप्त केलेले मासे दिले जातील असे त्यांनी सांगितले आहे.

पिकअप स्थानक, घाऊक मासळी बाजारासमोरील रस्ता, जुन्या बाजारानजीकचा कोलवा रस्ता व शहरी भागात मोक्मयाच्या ठिकाणी बेकायदा मासळीविक्री होत असल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांनी पालिकेकडे कारवाई करण्याची मागणी उचलून धरली आहे. त्यास धरून ही कारवाई होणार आहे. तसेच पालिकेने विविध कारणांस्तव रोखलेली प्लास्टिकविरोधी मोहीम देखील पुन्हा हाती घेतली जाणार आहे. तसेच प्रभागवार साफसफाई हाती घेण्यात आली आहे. प्रशासकीय कारभार जाग्यावर घालण्याचे काम सुरू झाले आहे. विविध दाखले देण्याच्या कामासही वेग देण्यात येत आहे, असे मुख्याधिकाऱयांनी नजरेस आणून दिले आहे.

दरम्यान, ज्यांच्या व्यवसायाला कोविड महामारीमुळे फटका बसला आहे अशा रस्त्यावरील विक्रेत्यांची माहिती घेणे चालू आहे. पंतप्रधान ’स्वनिधी’ योजनेच्या अंतर्गत त्यांना कर्ज म्हणून 10,000 रुपये देण्यात येतील. ही योजना खास रस्त्यावरील विपेत्यांसाठी आहे. स्थानिक नागरी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आपला समावेश की नाही याची खातरजमा करण्याची मुख्याधिकाऱयांनी विपेत्यांना विनंती केली असून समावेश नसल्यास अधिक माहितीसाठी सयेश याच्याशी 7972413922 या क्रमांकावर संपर्क  साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Related Stories

डिचोलीतील व्हिनस इथोक्सीथेर्स कंपनीमधील कामगारांवर घरी बसण्याची पाळी

Patil_p

मर्जीनुसार न वागणाऱया अधिकाऱयांचे खच्चिकरण

Amit Kulkarni

विकास, रोजगारासाठी काँग्रेसला विजयी करा

Patil_p

मोले भागात पट्टेरी वाघाचा संचार

Patil_p

पर्यटनमंत्र्यांची पैंगीणच्या परशुराम वसतीगृहास सदिच्छा भेट

Amit Kulkarni

ईलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी राज्यात लवकरच खास योजना

Amit Kulkarni
error: Content is protected !!