Tarun Bharat

बेकायदेशीर जमाव जमवल्याने एकावर गुन्हा

प्रतिनिधी / सातारा :

सदरबझारमधील मंदिरात अल्पवयीन मुलांकडून विटबंना करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी बेकायदेशीर जमाव जमवून जमाव बंदी आदेशाचा भंग केला. आणि नागरिकांना संबोधित करताना समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याने त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सदरबझार येथील मंदिरात रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास दोन अल्पवयीन मुलांनी मंदिरात शिरून विटबंना केल्याचा प्रकार घडला. हा प्रकार उघडकीस येताच सदरबझारमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांना मिळाली. जमावबंदीचे आदेश असताना पावसकर यांनी जमाव जमवून आदेशांचा भंग केला. तसेच परिसरातील नागरिकांना संबोधीत करताना समाजात तेढ निर्माण होईल. असे वक्तव्य केले. यामुळे त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक झालेली नाही. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत.

Related Stories

पाठलाग करुन दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

Patil_p

Satara; अमोल यादव यांची युरोप येथे ऑलम्पिक दर्जाच्या कुस्ती प्रशिक्षणासाठी निवड

Abhijeet Khandekar

वनविभागाच्या हद्दीतील रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावा

Patil_p

सातारा प्रति सरकारचे स्मारक ठिकठिकाणी उभे करा; प्रा. मच्छिंद्र सकटे यांची मागणी

Archana Banage

सातारा जिल्ह्यात ७६ जण पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू

Archana Banage

‘पार्थ’ने साधला सुवर्णपदकाचा निशाणा

Patil_p