Tarun Bharat

बेकायदेशीर मुरूम उत्खनन करणारे तीन ट्रक जप्त, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आले उघडकीस

प्रतिनिधी/शिरोळ

बेकायदेशीर मुरूम उत्खनन करीत असताना ग्रामपंचायत सदस्य वुषभ कोळी, प्रमोद कांबळे, दादा पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी तीन ट्रक जप्त करून तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी संबंधित ट्रक चालकांच्यावर अवैद्य उत्खनन केल्याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत दंडात्मक कारवाई सुरु होती.

अब्दुललाट ता. शिरोळ येथील अण्णामहाराज चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने पंचगंगा नदी काठावर घाटाचे बांधकाम सुरू आहे या नीता भराव्या साठी मुरूम नेत असल्याने ग्रामस्थ दुर्लक्ष केले होते. परंतु ट्रक चालकानी अन्यत्र विक्री करत असल्याचे समजले. अब्दुल लाट ग्रामपंचायतीचे सदस्य वृषभ कोळी, प्रमोद कांबळे, दादा पाटील व अन्य कार्यकर्त्यांनी अब्दुल लाट बोरगाव रस्त्यावरील गट नंबर 21 25 व 21 मधील बेकायदेशीर मुरुम उत्खनन करीत असताना तिन्ही ट्रक शिरोळ येथील तहसीलदार कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्याकडे ताब्यात दिले. तलाठी यांनी पंचनाम्याचे काम करून दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगितले.

Related Stories

Kolhapur Crime :आत्महत्येचा बनाव करत पत्नीनेच केला पतीचा घात

Archana Banage

बार्शीत शुक्रवारी आढळले १९ रुग्ण, एकूण संख्या १४०

Archana Banage

महाराष्ट्रातील कोरोना : मागील 24 तासात 9,336 नवे रुग्ण; 123 मृत्यू

Tousif Mujawar

तेलनाडे सापडला सम्राट, सावलाचा नंबर कधी ?

Abhijeet Khandekar

नळकनेक्शनसाठी कोणाची अडवणूक नको-उदयनराजे भोसले

Patil_p

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

Archana Banage