Tarun Bharat

बेकिनकेरेत नागनाथ सोसायटीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

बेकिनकेरे येथील श्री नागनाथ को-ऑप. पेडिट सोसायटीची 19 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी संस्थेच्या सभागृहात उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अंबाजी सावंत होते. व्यासपीठावर ता. पं. माजी उपाध्यक्ष यल्लाप्पा गावडे, ग्रा. पं. माजी अध्यक्ष अर्जुन डोंबले, व्हा. चेअमरन सोमनाथ सावंत, बळवंत सावंत यासह भावकू सावंत उपस्थित होते.

मॅनेजर संजय पाटील यांनी अहवाल वाचन केले. संचालक मल्लाप्पा गावडे यांनी अंदाजपत्रक सादर केले. यावषी संस्थेला 4,45,730 इतका निव्वळ नफा झाला असून संस्थेकडे 7,53,33,620 रुपयांच्या ठेवी आहेत. वार्षिक उलाढाल 16 कोटी तर 2,89,60,000 इतकी गुंतवणूक आहे. 5,39,63,554 इतक्मया कर्जाचे वाटप केले असून सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर केला आहे. 

यावेळी यल्लाप्पा गावडे म्हणाले, संस्थेने सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत गरीब व तळागाळातील जनतेच्या ठेवींना सुरक्षितता दिली आहे. शेतीसंबंधी यंत्रोपकरणासाठी अर्थसहाय्य पुरवून सभासदांचे हित जपले आहे. यावेळी ग्रा. पं. माजी अध्यक्ष अर्जुन डोंबले यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी व माजी आमदार बी. आय. पाटील यासह चेअरमन अंबाजी सावंत यांच्या मातोश्री लक्ष्मी सावंत व संचालिका सुनिता भोगण यांचे पती अर्जुन भोगण यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली. ओम साई सोसायटीच्या चेअरमनपदी बळवंत सावंत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा नागनाथ सोसायटीतर्फे सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संचालक चंद्रकांत भोगण, गंगाराम सावंत, नारायण सावंत, आनंद धायगोंडे, नागेंद्र राजगोळकर, संचालिका सुनिता भोगण, गंगाराम लक्ष्मण सावंत, नारायण सावंत, कृष्णा भोगण, लक्ष्मण शिंदोळकर, परशराम भातकांडे जिवनाप्पा बाळेकुंद्री, डॉ. गवीमठ, भाग्यश्री तोरे, नागेश्वरी भडांगे, प्रमोद यळळूरकर, यल्लाप्पा भडांगे, देमाणी गावडे व सभासद उपस्थित होते.

Related Stories

होनगा लिंगायत स्मशानभूमीत शेडचे लोकार्पण

Patil_p

परप्रांतीय कामगारांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दी

Patil_p

तंत्रज्ञान, उपग्रहांद्वारे देशाची प्रगती शक्य

Patil_p

सौर उर्जेद्वारे रेल्वेविभाग करणार विजनिर्मिती

Patil_p

कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस फुल्ल

Amit Kulkarni

चित्रप्रदर्शनातून जागविल्या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती !

Omkar B
error: Content is protected !!