Tarun Bharat

बेकिनकेरे-गोजगा रस्त्याकडे साफ दुर्लक्ष

प्रतिनिधी / बेळगाव

बेकिनकेरे-गोजगा या दोन किलो मीटरच्या संपर्क रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्याची दुर्दशा झाली असून जागो-जागी मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना ये-जा करणे धोक्मयाचे बनले आहे. शिवाय किरकोळ अपघात घडत असल्याने नागरिकांतून संताप क्यक्त होत आहे. अनेक वेळा रस्त्याविषयी तक्रारी व निवदेन देऊनही अद्याप याची दखल घेतली नाही.

  गेल्या दोन वर्षापासून या खड्डेमय रस्त्याकडे लोकप्रतिनिधी व संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाल्याने दुरूस्ती व डांबरीकरणाचे काम रखडले आहे. 10 वर्षापूर्वी सदर रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र त्यानंतर या रस्त्याची साधी डागडुजीही केली नाही. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे.

 रस्ता बेकिनकेरे, अतिवाड, गोजगासह चंदगड तालुक्मयातील कोवाड, होसूर, कौलगे, किटवाड आदी गावातील नागरिकांना हा सोयीस्कर आहे. बेळगावला येण्यासाठी कमी अंतराचा रस्ता असल्याने वाहनांची वर्दळ असते. मात्र रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहनधारकांना वाहने चालविणे कसरतीचे बनले आहे. तसेच खड्डेमय रस्त्याबरोबरच रस्त्याच्या दुतर्फा झाडे-झुडपे वाढल्याने रस्ता झाकला गेला आहे. त्यामुळे रस्त्यांची रूंदी कमी झाली आहे. परिणामी अवजड वाहनांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे.

 आता ग्रा. पं. निवडणुकीची तारीख घोषित केली आहे. निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, रस्ता दुरूस्तीबाबत कोणतीच हालचाल होताना दिसत नाही. निवडणूक आली की, आश्वासनाचा पाऊस पडतो. निवडणूक संपताच विकास कामाचा विसर पडतो. अशीच अवस्था या रस्त्याची झाली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तरी या रस्त्याचे काम हाती घेणार का? असा संतप्त प्रतिक्रिया या भागातील नागरिकांतून व्यक्त होत आहेत.

Related Stories

अगसगे ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा

Amit Kulkarni

कोगनोळी टोलनाकानजीक 4 एकर ऊस खाक

Amit Kulkarni

संकल्प आमोणकर यांच्याकडून मोटरसायकल व रिक्षा टॅक्सी व्यवसायीकांना सवलतीच्या दरात इंधन,

Amit Kulkarni

अल्पसंख्याकांच्या समस्या तातडीने सोडवा

Amit Kulkarni

दरमहा 18 हजारांची नोकरी देण्याचे सांगून फसवणूक

Amit Kulkarni

जायंट्स मेन कडून मदन बामणे यांचा सन्मान

Amit Kulkarni