Tarun Bharat

बेकिनकेरे येथे वन्यप्राण्यांचा हैदोस

पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी संकटात : भरपाईची मागणी, वनविभागाचे दुर्लक्ष

प्रतिनिधी / बेळगाव

सतत नैसर्गिक संकटामुळे पीक जमवताना शेतकरी मेटाकुटीला येत आहे. त्यातच भर म्हणून अतोनात खर्च करत, कष्टाने केलेली पिके वनप्राण्यांकडून फस्त केली जात आहेत. बेकिनकेरे गावातील शेतकऱयांच्या पिकांचेही वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे मोठ नुकसान होत आहे. दरवषी रब्बी हंगामातील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

महाराष्ट्राच्या बाजूने असलेल्या डोंगर पायथ्याशी गावच्या शेतीचे क्षेत्र आहे. यामुळे डोंगरालगत असलेल्या शिवारात रात्रीच्यावेळी वन्यप्राणी येऊन धुडगूस घालत आहेत. शिवाय उन्हाळय़ात डोंगरात खायला काही मिळत नसल्याने शेतकऱयांची पिके फस्त करत आहेत. शेतकऱयांनी ऊस, मका, जोंधळा व इतर पिकांची साळींदर, जंगली डुक्कर, गवीरेडे व मोर आदींनी मोठय़ा प्रमाणात नुकसान केले आहे. गावातील नारायण मोरे, गजानन मोरे, केदारी भोगण, यल्लाप्पा भोगण, सचिन भोगण, विश्वनाथ भोगण, गुणाप्पा भोगण, भरमा भोगण, बाळू भोगण यासह अनेक शेतकऱयांचे नुकसान झाले आहे. रात्री-अपरात्री गवीरेडे व डुकरांचा कळप येऊन संपूर्ण शिवारात हैदोस घालत आहे. त्यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे.

काही शेतकऱयांनी शेतीला कुंपण घातले असले तरी पुंपण मोडून वन्यप्राण्यांचा हैदोस सुरूच आहे. तसेच काही शेतकरी पिकांची राखण करण्यासाठी रात्र जागून काढत असले तरी गवीरेडय़ासारख्या मोठय़ा वन्यप्राण्यांकडून नुकसान होत आहे. या वन्यप्राण्यांकडून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.

 यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नुकसानीची पाहणी करावी आणि संबंधित शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, तसेच वन्यप्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Related Stories

पोलीसांना मास्क व सॅनिटायझरचे वितरण

Patil_p

प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीची सभा खेळीमेळीत

Amit Kulkarni

समितीच्या एकीमुळे कार्यकर्त्यांत उत्साह

Amit Kulkarni

पोलीस असल्याचे सांगून वृद्धाला लुटले

Amit Kulkarni

‘हरे कृष्ण’च्या गजरात इस्कॉन रथयात्रा

Patil_p

खासगी बस पलटली; वर्हाडी झाले जखमी ….

Rohit Salunke