Tarun Bharat

बेटिंग टोळीस अटक

प्रतिनिधी /पर्वरी

पर्वरी पोलिसांनी  काल रात्री उशिरा पाकिस्तान  सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत बेटिंग घेणाऱया टोळीचा पर्दाफाश केला असून यासंबंधी पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना मुद्देमालासह अटक केले आहे व  त्यांच्याकडून 13 मोबाईल संच,तीन लेपटोप व इतर साहित्य मिळून पाच लाखांचा माल जप्त केला आहे.या संबधी पोलिसांनी वीरेंद्र रणशूर (28),आदित्य सिंग (23),चंद्रदेवा सिंग राठोड(28),अमित कच्चावला (25),दिग्वजिय देवांग(28),आणि प्रशांत बाग(30) या सहा जणांना अटक केले आहे.

या संबंधीचे सविस्तर वृत्त असे कि सद्या पाकिस्तान  सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत सुरु असून काल रात्री लाहोर क्वलंडर आणि इस्लामाबाद युनाटेड या संघा दरम्यान स्पर्धा सुरु असताना अल्ट? पर्वरी येथील एका सदनिकेत बेटिंग सुरु असल्याचे खात्रीदायक बातमी खबऱया मार्फत पर्वरी पोलिसांना  समजली त्यानुसार पर्वरी उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्वरी पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकून पोलिसांनी वरील सहाजणांना मुद्देमालासह ताब्यात घेतले .पोलिसांनी त्यांच्यावर बेकायदा सट्टेबाजी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केले आहे.ही कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक गावकर यांच्या समवेत उपनिरीक्षक सीताराम मळीक,उपनिरीक्षक प्रतिक भट, हवलदार महादेव नाईक,भिकाजी परब,उत्कर्ष देसाई आणि योगेश शिंदे यांचा समावेश होता.पुढील तपास उतर गोवा अधीक्षक शोबित सक्श?ना यांच्या मार्गदर्शनाखाली  उपअधीक्षक कर्पे करीत आहे.

Related Stories

डिचोली बाजार 50 टक्केच भरला, तरीही सामाजिक अंतराचे तीनतेरा

Amit Kulkarni

नोकरीत घेत नाही तोपर्यंत अझाद मैदानावरून हलणार नाही

Patil_p

गोवा राज्य संग्रहालयातर्फे ‘राष्ट्रीय संग्रहालय आठवडा’ निमित्त विविध कार्यक्रम

Patil_p

माशेलातील कलाकार उमेदीने साकारताय पारंपारिक ‘रातकाला’

Amit Kulkarni

मुरगावात शासकीय कर्मचाऱयांच्या बदल्या व घर दुरूस्तीचे कामे रोखण्याचे प्रकार

Amit Kulkarni

अदानींच्या फायद्यासाठी गोव्याच्या नैसर्गिक स्रोतांचा बळी

Patil_p