Tarun Bharat

बेडकिहाळमध्ये कोरोनाचा पहिला बळी

नागरिकांत भीतीचे वातावरण : 50 मीटरपर्यंत परिसर सीलडाऊन

वार्ताहर/ बेडकिहाळ

येथील एका 57 वषीय व्यक्तीचा रॅपिड चाचणीतून अहवाल शनिवार दि. 8 रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. अहवाल आल्यानंतर सदर व्यक्तीला चिकोडी येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रविवार 9 रोजी रात्री 10 च्या दरम्यान त्या व्यक्तीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर या व्यक्तीवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत होते. रविवारी रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर व्यक्तीच्या प्रथम संपर्कातील सहा कुटुंबे आल्याने व्यक्तीच्या घरांपासून 50 मीटरपर्यंत परिसर पूर्णपणे सील करून परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. सदर व्यक्तीवर चिकोडीमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्राम महसूल उपनिरीक्षक एस. एम. नेमनावर, सदलगा पोलीस स्टेशनचे बिट हवालदार श्रीकांत देवर, ग्रामपंचायत माजी अध्यक्ष शंकरदादा पाटील, माजी सदस्य प्रशांत पाटील, सचिन पाटील. गजानन दुर्गांवर, ग्राम सहायक कुमार शास्त्री, शिवू शेट्टी यांच्यासह काहींनी बाधित भागात भेट देऊन परिसर सीलडाऊन केला.

चिकोडी शहरात 6 रुग्णचिकोडी : सोमवारी चिकोडी शहरातील सहा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरात घबराट पसरली आहे. यापैकी तिघेजण पोलीस कॉलनीमधील रहिवासी आहेत. तर सरकारी इस्पितळातील एक कर्मचारी तसेच होसपेट गल्लीतही कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. याशिवाय शहरातील सरकारी कर्मचाऱयांची कॉलनी म्हणून ओळख असलेल्या हरिनगर येथीलही एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चांगलीच घबराट पसरली आहे.

Related Stories

वेटलिफ्टिंग स्पर्धेत वैभवी, श्वेता यांना रौप्य

Amit Kulkarni

‘शांताई’ने उचलली अनाथ मुलांची जबाबदारी

Patil_p

ओमकार पाटील यांचा मुख्यमंत्री प्रशंसा प्रमाणपत्राने गौरव

Patil_p

पुणे-बेळगाव विमानसेवा झाली पूर्ववत

Patil_p

बेळगावात ‘डायल 112’ सेवेचा शुभारंभ

Patil_p

सुबोध पाटीलने पिरनवाडी मैदान जिंकले

Amit Kulkarni