Tarun Bharat

बेडकिहाळ आरोग्य केंद्राला सुविधारुपी व्हेंटिलेटरची गरज

Advertisements

कायमस्वरुपी वैद्याधिकारी नसल्याने गैरसोय : आयुष्य अधिकाऱयांसह 13 पदे रिक्त : रुग्णांसमेर अनेक अडचणी

वार्ताहर / बेडकिहाळ

येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेसाठी एकेकाळी संजीवनी बनले होते. मात्र सरकारी जाचक धोरण व येथील राजकारणामुळे आज याच आरोग्य केंद्राला जिवंत ठेवण्यासाठी सुविधारुपी व्हेंटिलेटरची गरज भासत आहे. सध्या आरोग्य केंद्राला कायमस्वरुपी वैद्याधिकारी उपलब्ध नाही. तसेच 13 हून अधिक रिक्त जागा असल्याने रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. कायकल्प स्पर्धेत राज्यात हॅट्ट्रिक साधलेल्या सदर आरोग्य केंद्राला वाली आहे की नाही, असा सवाल उपस्थित होताना संताप व्यक्त होत आहे.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे 24 तास सेवा देताना रुग्णांना आजारातून मुक्त करत होते. या आरोग्य केंद्राचे भाग्यविधाते डॉ. शिवानंद एच. जी. यांच्यामुळे  सदर आरोग्यविधाते नावारुपास आले. त्याचा वारसा पुढे चालविणाऱया या आरोग्य केंद्राचे आयुष्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना कुलकर्णी व त्यांचे सर्व कर्मचारी वर्ग यांच्या विशेष प्रयत्नाने केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कर्नाटक शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने सण 2017-18 या सालातील कायकल्प पुरस्कार पटकाविले होते. तर 2018-19 सालातील हा पुरस्कार दुसऱयांदा पटकावून आरोग्य खात्यात इतिहास नोंदवत पुन्हा एकदा राज्यात पाचवा तर बेळगाव जिल्हय़ात पहिला क्रमांकाचे मानकरी ठरले होते. आता याच टीमने पुन्हा 2019-20 सालातील कायकल्प पुरस्कार स्पर्धेत 93.3 टक्के गुण मिळवत तिसऱयांदा हा ’किताब पटकाविला.

चार गावांचा केंद्रावर भार

बेडकिहाळ, चाँदशिरदवाड, शमनेवाडी, नेज या चार गावांसाठी हे आरोग्य केंद्र असून या अगोदर दररोज 80 ते 100 बाहेरील रुग्ण, महिन्याला 20 ते 30 महिलांची प्रसूती, 30 हून अधिक शस्त्रक्रिया केल्याचा इतिहास आहे. आरोग्य केंद्रात स्वच्छता, दिशादर्शक, रुग्णांची विचारपूस, औषध वितरण, शस्त्रक्रिया, प्रसूती, गर्भवतींची घेण्यात येणारी काळजी, शुद्धपाणी, विविध रोगांवर शिबिरांचे आयोजन, 24 तास सेवा, यासह अनेक सेवासुविधा पुरविल्या जात होत्या. आजवर या आरोग्य केंद्रात आयुष्य अधिकारी म्हणून डॉ. अर्चना कुलकर्णी या धुरा सांभाळत रुग्णांचे हित सांभाळत होते.

वैद्याधिकारी  नसल्याने गैरसोय

आरोग्य केंद्रात अजून 13 पदे रिक्त आहेत. यासाठी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱयांनी लक्ष घालून बेडकिहाळ आरोग्य केंद्र हे समुदाय आरोग्य केंद्र करण्यासाठी पुढे येत याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांतून होत आहे.

Related Stories

पत्रलेखनातील जीएंचे व्यक्तिमत्त्व आगळेवेगळे

Omkar B

एकेपी फेरोकास्ट कंपनी ठरली देशात अव्वल

Patil_p

मनपाच्या व्यापारी गाळे लिलाव प्रक्रियेला चांगला प्रतिसाद

Patil_p

कॅन्सरग्रस्त आईची सर्व काळजी घेणारा ‘किट्टू’ रोबोट

Patil_p

एक्स्प्रेसला पास चालत नसल्याने प्रवासी नाराज

Amit Kulkarni

निवृत्त शिक्षिका आनाशावेरीन फर्नांडिस यांचे निधन

Tousif Mujawar
error: Content is protected !!