Tarun Bharat

बेडग येथे घर फोडून रोकड, दागिने लंपास

प्रतिनिधी / मिरज

मिरज तालुक्यातील बेडग येथे संजीरबा चौकात घर फोडून चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा 36 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत अण्णासाहेब शंकर आवटी (वय 30) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.

दरम्यान, मिरज तालुक्याच्या पूर्व भागात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, आठवडाभरात ही दुसरी घरफोडी आहे. 2 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट या कालावधीत आवटी यांच्या घरात चोरी झाली आहे. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी आवटी यांच्या घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेली पाच हजारांची रोख रक्कम, सोन्याचे मणी मंगळसूत्र आणि पैंजण असा 36 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

Related Stories

सांगली : माडग्याळ जवळ अपघात,दुचाकीस्वार जागीच ठार

Archana Banage

सांगली : ग्रामसेवकाच्या अनास्थेमुळे एरंडोली ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

Archana Banage

सांगलीत तब्बल 1011 जण कोरोनामुक्त

Archana Banage

कवठेमहांकाळच्या नगराध्यक्षपदी अश्विनी पाटील

Archana Banage

तासगावचा सहाय्यक पोलीस फौजदार ’लाचलुचपत’च्या जाळ्यात

Archana Banage

जतमध्ये एक हजाराची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात

Archana Banage