फिरोजाबादमधील उमेदवार चर्चेत: हातात भिक्षापात्र घेत मागतोय देणगी
उत्तरप्रदेशच्या फिरोजाबादमध्sय निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. येथे तिसऱया टप्प्याच्या अंतर्गत 20 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. अशा स्थितीत उमेदवार स्वतःच्या बाजूने मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळय़ा प्रकारच्या युक्ती लढवत आहेत. फिरोजबाद शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रामदास मानव यात अजब प्रकारे प्रचार करत आहेत. ते स्वतःच्या शरीराला बेडय़ा अन् साखळदंडात जखडून घेत लोकांकडून मतांसह देणगीच्या स्वरुपात रक्कम मागत आहेत.
रामदास मानव हे बांगडय़ा तयार करणाऱया मजुरांचे नेते आहेत. या मजुरांचे शोषण होत असल्याचे त्यांचे सांगणे आहे. बांगडय़ा तयार करणाऱया मजुरांशी स्थिती खराब असून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी निवडणुकीत उतरल्याचे ते सांगतात. त्यांना निवडणूक चिन्ह देखील बांगडय़ा हेच मिळाले आहे. रामदास मानव स्वतःच्या निवडणूक चिन्हाचा प्रचार करण्यासाठी लोकांमध्ये जात आहेत. रामदास मानव स्वतः देखील मजूर असल्याने त्यांच्याकडे निवडणुकीत खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. यामुळे लोकांसमोर भिक्षापात्र पुढे करत ते नोट आणि व्होट दोन्हीही मागत आहेत. कारखान्याने मजुरांना या बेडय़ांप्रमाणेच जखडून ठेवले आहे. मजूर स्वतंत्र व्हावा याकरता निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचे त्यांचे सांगणे आहे. या बेडय़ा हटतील तेव्हाच मजूर स्वतंत्र होईल. निवडणुकीत यशस्वी ठरलो तरच या बेडय़ा हटतील असे त्यांनी म्हटले आहे. रामदास मानव यांना या मजुरांच्या वस्ती लोक पैसे देऊन देखील मदत करत आहेत