Tarun Bharat

बेड उपलब्धतेची माहिती वेळोवेळी घेणार

खासगी इस्पितळांच्या संपर्कात राहण्याची सूचना : मुख्यमंत्र्यांनी घेतली अधिकाऱयांची बैठक

प्रतिनिधी / बेंगळूर

मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मंगळवारी बेंगळूरमधील अधिकृत निवासस्थान ‘कावेरी’ येथे परिवहन कर्मचाऱयांचा संप आणि कोरोना परिस्थितीविषयी अधिकाऱयांशी चर्चा केली. कामावर हजर झालेल्या परिवहन कर्मचाऱयांना सुरक्षा पुरविण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांना दिली. तसेच खासगी इस्पितळांमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी बेडच्या उपलब्धतेची माहिती वेळोवेळी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना संसर्गवाढीमुळे कोरोनाबाधित रुग्णांसाठी खासगी इस्पितळांमध्ये उपलब्ध असणाऱया बेडची संख्या वेळोवेळी जमा करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. लसीची कमतरता भासू नये, यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी नियमित संपर्कात राहून आवश्यकतेनुसार लसीचे डोस मिळविण्याची सूचना येडियुराप्पा यांनी अधिकाऱयांना यावेळी दिली.

राज्यातील आठ शहरांमध्ये जारी असणारा नाईट कर्फ्यु आणखी कठोर करण्याची सूचना येडियुराप्पांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांना दिली. मायक्रो कन्टेन्मेंट झोनमध्ये कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविणे, बाधितांच्या संपर्कात येणाऱयांचा शोध घेऊन चाचणी करणे, मास्कचा वापर व शारीरिक अंतर न राखणाऱयांवर कारवाई करणे, नाईट कर्फ्युचा कालावधी वाढविण्याबाबत टास्क फोर्सच्या सदस्यांची मते मागविण्याची सूचनाही अधिकाऱयांना यावेळी देण्यात आली.

कामावर हजर होणाऱया परिवहन कर्मचाऱयांना सुरक्षा

कामावर हजर झालेल्या कर्मचाऱयांवर व परिवहन मंडळाच्या बसेसवर हल्ला करणाऱयांविरुद्ध कठोर कारवाई करावी. तसेच संपावरील कर्मचाऱयांना सहावा वेतन आयोग जारी करणे अशक्य असण्यामागची कारणे समजावून देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आवश्यकता भासली तर प्रत्येक बसमध्ये सुरक्षेसाठी एक कॉन्स्टेबल तैनात करावा. कामावर हजर न होणाऱया कर्मचाऱयांवर आणखी कठोर कारवाई करावी, अशी सूचनाही अधिकाऱयांना देण्यात आल्याचे समजते. बैठकीप्रसंगी राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार, बेंगळूर शहर पोलीस आयुक्त कमल पंत तसेच परिवहन आणि आरोग्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

कर्नाटक: तालुक्यातील रुग्णालयात भूलतज्ञांची कमतरता

Archana Banage

राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चेने इतर पक्षातून आलेले आमदार चिंतेत

Archana Banage

Karnatak; पुनीत राजकुमारला ‘कर्नाटक रत्न’ पुरस्कार 1 नोव्हेंबरला

Kalyani Amanagi

वादग्रस्त सीडी प्रकरणाचा तपास अहवाल सादर करा

Amit Kulkarni

सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची तातडीने बैठक घ्या ; सर्व पक्षीय कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Archana Banage

साखर कारखान्यांनी उसाची शिल्लक बिले द्यावीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!