Tarun Bharat

बेतोडा येथे फॅन पट्टय़ा पावडर कोटींग युनिटला आग

आगीत रू. 3 लाखाची हानी, सुदैवाने जीवीतहानी टळली

प्रतिनिधी /फोंडा

बतोडा औद्योगिक वसाहतीतील एका नामांकीत फॅन पंपनीच्या आऊटसोर्सिग करण्यात आलेल्या पावडर कोटींग युनिटला आग लागून सुमारे रू. 3 लाख किमतीच्या मालमत्तेची नुकसानी झाली. सदर घटना काल शुक्रवारी सायंकाळी 4.30 वा. सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

फोंडा अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार एका नामांकीत फॅन कंपनीचे मोटर व पट्टय़ा पावडर कोटींग करण्याचे काम अरूण खेडेकर यांच्या आरकेड इंजिनिअरींग युनिटमध्ये चालते. पावडर कोटींगसाठी वापरण्यात येत असलेल्या बट्टीला अचानक आग लागल्याने सदर दुर्घटना घडली. फोंडा अग्निशामक दलाचे जवान पोचेपर्यंत शेडचे सिंमेटचे पत्रे फुटून बट्टी आगीच्या भक्ष्यस्थानी होती. एकूण चार भट्ठय़ाची आगीत जबर नुकसानी झाली. आग आटोक्यात येत नसल्यामुळे पुंडई येथील बंबाना पाचारण करण्यात आले. यावेळी फोंडयाचे दोन व पुंडईचा 1 मिळून तीन बंब वापरण्यात आले. शेड लागून असलेल्या युनिटला आग पोचू नये यासाठी अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न केले. 

आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी फोंडा अग्निशामक दलाला  देण्यात आलेली ‘फायर बाऊसर’ ही अत्याधुनिक तंत्रज्ञानानियुक्त वाहनही उपलब्ध नव्हते. यावेळी फोंडा व पुंडई अग्निशामक दलाचे राजेद्र हळदणकर, सुशील मोरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष नाईक, देऊ लांबोर, देवीदास बायेकर, मोतीराम गोवेकर, मनोज नाईक, जानु जाते, सुरज काकोडकर, अंकुश नाईक, नवजीत मुळी, गीतेश नाईक, सचिन गोवेकर, जितेंद्र भंडारी यांनी महत्वाचे मदतकार्य करून आग आटोक्यात आणली. 

Related Stories

‘धरोहर’ ठरणार पर्यटन आकर्षण

Patil_p

मोले चेकनाक्यावरुन होणारी वाहतूक बंद करा

Patil_p

मडगाव शिमगोत्सव समितीच्या बदनामीचे षड्यंत्र

Amit Kulkarni

शुक्रवारी कोरोनाचे दोन बळी

Omkar B

समविचारी पक्षांशी युतीचा विचार

Amit Kulkarni

मडगावात बेकायदा गाडेवजा दुकानांच्या शेड हटविल्या पालिकेची कारवाई

Amit Kulkarni