Tarun Bharat

बेनकनहळ्ळीतील नूतन सदस्यांचा ब्रम्हलिंग सोसायटीतर्फे सत्कार

Advertisements

वार्ताहर/ हिंडलगा

बेनकनहळ्ळी येथील दि ब्रम्हलिंग मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने गावातील नूतन ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. अध्यक्षस्थांनी संस्थेचे चेअरमन मल्लाप्पा हिरोजी होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर संचालक मंडळाच्या हस्ते नूतन सदस्य कल्लाप्पा देसूरकर, महेश कोलकार, गणेश सुतार, भरमा कोलकार, कलावती देसूरकर, शिल्पा मुंगळीकर, मिनाक्षी पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊन सर्वांनी कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता गावच्या विकासासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

व्हा. चेअरमन शिवाजी कोलकार, संचालक डॉ. राजू पाटील, प्रकाश पाटील, प्रभाकर देसूरकर, जोतिबा देसूरकर, आनंद पाटील, यल्लाप्पा देसूरकर, दीपक देसूरकर, कृष्णा काटकर, साधना देसूरकर, कर्मचारी राहुल पाटील, प्रशांत पाटील, व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. राजू पाटील यांनी केले. सेक्रेटरी मारुती पाटील यांनी आभार मानले.

Related Stories

बिबटय़ासाठी आता काय करावे?

Patil_p

बिजगर्णी गावात भरविणार कुस्ती आखाडा

Amit Kulkarni

राज्य शासनाकडून कॅन्टोन्मेंटला 16 लाखाचे अनुदान

Omkar B

निपाणीत कार अपघातात चौघे गंभीर

Patil_p

नाटय़ महोत्सवाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद

Amit Kulkarni

पडलवाडी जंगलातील वाळू तस्करीची तहसीलदारांकडून पाहणी

Patil_p
error: Content is protected !!