Tarun Bharat

बेनकनहळ्ळी ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील मंडळांना पोलिसांकडून मार्गदर्शन

Advertisements

वार्ताहर /किणये

बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना कॅम्प पोलीस व वडगाव ग्रामीण पोलिसांकडून गणेशोत्सव संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा प्रेमा हिरोजी या होत्या.

बेनकनहळ्ळी, सावगाव व गणेशपुरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. गणेशोत्सव कसा साजरा करावा, तसेच परवानगी घेण्याबद्दल पोलीस अधिकाऱयांनी मार्गदर्शन केले. तसेच सर्व मंडळांनी सहकार्य करून हा उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. कॅम्प पोलीस स्टेशनचे अधिकारी, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस तसेच ग्रामपंचायत उपाध्यक्ष अंजना नाईक, पीडीओ गंगाधर नाईक, सेक्रेटरी प्रताप मोहिते आदींसह ग्रामपंचायत सदस्य व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

टीईटीसाठी अर्जभरणा प्रक्रियेला सुरुवात

Amit Kulkarni

सोमवारी कोरोनाचे 5 नवे रुग्ण

Amit Kulkarni

खेलो इंडिया राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेसाठी डीवायईएस संघ दिल्लीला रवाना

Omkar B

हंगरगे ग्रामस्थांच्यावतीने सुरेश अंगडी- बी.आय.पाटील यांना श्रद्धांजली

Patil_p

जाचक जीएसटी रद्द करा !

Tousif Mujawar

सिद्धिविनायक फौंडेशनतर्फे सुवर्ण सिंहासनासाठी मदत

Patil_p
error: Content is protected !!