Tarun Bharat

बेपत्ता तरुणाचा तिलारीत मृतदेह

प्रतिनिधी / साटेली भेडशी:

झरेबांबर येथील अनिल गणपत गवस (45) 22 जानेवारीपासून बेपत्ता होते. रविवारी दुपारी शोधादरम्यान त्यांचा मृतदेह तिलारी डावा कालवा साटेली-भेडशी भोमवाडी येथे आढळला.

याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल गवस शुक्रवारी सायंकाळपर्यंत आपल्या घरी परतले नाहीत. उशिरापर्यंत येणार म्हणून त्यांची वाट पाहिली. मात्र, ते न आल्यामुळे पत्नी अनुराधा गवस यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली. रविवारी त्यांच्या शोधादरम्यान साटेली-भेडशी भोमवाडी येथील डाव्या कालव्यात त्यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर या घटनेची माहिती दोडामार्ग पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नेऊन उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई असा परिवार आहे. अधिक तपास दोडामार्ग पोलीस ठाण्याचे हवालदार भरत जाधव करत आहेत.

Related Stories

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला वेदांत कंपनीतर्फे अत्याधुनिक उपकरणे

Anuja Kudatarkar

पुढील काळ हा अस्मिचाच…

Anuja Kudatarkar

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त बांधकाम विभागातर्फे रक्तदान शिबीर

Anuja Kudatarkar

रत्नागिरी : दापोलीतील बंद एस. टी. फेऱ्या तात्काळ सुरू करा

Archana Banage

गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई

Anuja Kudatarkar

स्वतःचा आजार विसरून कोरोनाग्रस्तांच्या सेवेत

NIKHIL_N