Tarun Bharat

बेपत्ता सिद्धी नाईकचा बागा येथे बुडून मृत्यू

Advertisements

शवचिकित्सा अहवालातून झाले स्पष्ट

प्रतिनिधी / म्हापसा

नास्नोळा बार्देश येथील सिद्धी संदीप नाईक (वय 25) हिचा मृतदेह कळंगूट समुद्रात मृतावस्थेत सापडला असून तिच्या वडिलांनी ती आपलीच मुलगी असल्याचे सांगितल्यावर कळंगूट पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सासाठी बांबोळी येथे पाठवून दिला. शवचिकित्सा अहवालात सिद्धी हिचा मृत्यू बुडून झाल्याचे म्हटले आहे.

दरम्यान याबाबत अधिक माहिती देताना उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित  सक्सेना म्हणाले की, दोन दिवसांपासून सिद्धी नाईक बेपत्ता होती. तिचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. शिवाय कुटुंबियांनी तिची माहिती देणाऱयास बक्षिसही जाहीर केले होते. मयत व्यक्ती सिद्धी एका मॉलमध्ये कामाला होती. ती ग्रीन पार्ककडून बेपत्ता झाली होती अशी माहिती हाती आली आहे.

काल गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह समुद्रकिनारी तरंगताना आढळला. तिच्या वडिलांनी म्हापसा पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. घटनेची माहिती कळंगूट पोलिसांना दिल्यावर कळंगूट पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व तिच्या वडिलांना बोलावून घेतले असता ती सिद्धीच असल्याचे स्पष्ट झाले.

Related Stories

कामाक्षी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा परवाना रद्द

Amit Kulkarni

‘धाबरी कुरुवी’चा आंचिममध्ये प्रीमियर

Amit Kulkarni

हरमल येथे नारायणदेव बाल नाटय़मंडळाचा ‘एका नाटकाचे नाटक’ नाटय़प्रयोग रंगला

Amit Kulkarni

वास्कोच्या नगरसेविकेचा सातोसे येथे सत्कार

Amit Kulkarni

कुडचडेत आणखी 8 दिवस लॉकडाऊन करण्याची मागणी

Amit Kulkarni

ख्रिश्चन उमेदवार शिवोलीत इतिहास घडवणार?

Patil_p
error: Content is protected !!