Tarun Bharat

बेरोजगारी हिच देशासमोरील प्रमुख समस्या : सत्यजीत तांबे

प्रतिनिधी / सोलापूर

मोदी सरकारने सीएए कायदा आणला आहे. परंतु दुसरीकडे पाकिस्तानचा अदनान सामी भारताचा नागरिक होऊ शकतो. त्याला भारतीय नागरिकत्व दिले आहे. मोदी सरकारने सामी यांना भारताचा सर्वोच्च पुरस्कार पदमश्री बहाल केला आहे. त्यामुळे अशी नियमावली असताना सीएएची गरज काय ? त्यापेक्षा बेरोजगारी हा देशासमोरील प्रमुख समस्या असल्याने मत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले.

  काँग्रेस भवन येथे शनिवारी सकाळी 8 वाजता आमदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बेरोजगारीचे पोस्टर प्रदर्शीत केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक निरीक्षक तथा सासवडचे नगरसेवक गणेश जगताप, सोलापूर शहर अध्यक्ष अंबादास करगुळे, प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, माजी नगरसेवक मनोज यलगुलवार, प्रदेश सरचिटणीस सुमित भोसले, जिल्हा अध्यक्ष नितीन नागणे, बारामती चे युवक अध्यक्ष संभाजी देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

  या कार्यक्रमास सुभाष वाघमारे, बाबुराव क्षीरसागर, संतोष अट्टेलूर, महेश लोंढे, संजय गायकवाड, सचिन शिंदे, नागेश म्याकल, बबलू बागवान, शाहू सलगर, शरद गुमटे, सागर राठोड, विकास राठोड, अविनाश खरटमल, प्रशांत गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, विश्वास गज्जम आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

सोलापुरात आज 4 नवे कोरोनाग्रस्त; संख्या 65 वर

Archana Banage

१० हजाराची लाच घेताना मिरजगीचा तलाठी गणेश कदम एसीबीच्या जाळ्यात

Archana Banage

एम.आय.डी.सी. बाबत पंधरा वर्षे रखडलेले अडथळे दूर करणार – उद्योगमंत्री तटकरे

Archana Banage

सोलापूर : कृषी कायद्याच्या विरोधात महिंसगाव येथे रास्ता रोको

Archana Banage

सोलापूर शहराने ओलांडला पाच हजार पॉझिटिव्ह रुग्णांचा टप्पा

Archana Banage

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर

Archana Banage