Tarun Bharat

बेलवळे बुद्रुक येथे ५५ एकर ऊस जळून खाक; पाच लाखाचे नुकसान

Advertisements

व्हनाळी : वार्ताहर

बेलवळे बुद्रुक (ता. कागल) येथील दुधगंगा नदीकाठ ते काळाबागदेव मंदिरा पर्यंत सुमारे ५५ एकर क्षेत्रातील शेतक-याच्या उसाला शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले.

नदीकाठी असलेल्या दत्त मंदिराजवळ असलेल्या डी.पी. च्या शेजारी असलेल्या विद्युत पोल वरती तारांच्याशॉर्टसर्किट मुळे उसाच्या फडाला दुपारी साडेबाराचे दरम्यान आग लागली आणि हा हा म्हणता उन्हा मुळे सुमारे ५०एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. बिर्दीच्या अग्निशामकपाण्याच्या बंबानाही आग विझवण्यास मर्यादा आल्या. पाण्याच्या बंबानी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण रस्त्यावर गाडी उभारून ऊसाला लागलेल्याआगी पर्यंत शेतातून जाता येत नसल्यामुळे ऊस जळून खाक झाला.

आपदग्रस्त शेतकऱ्यांची नावे, कृष्णा ज्ञानू काशिद, आनंदा सावेकर, आनंदा कदम, प्रकाश नंदगावे, बाळू कदम, राजेंद्र हिंदूराव पाटील, बाबुराव पाटील, आदी सुमारे चाळीस भर शेतकऱ्यांचा ऊस जळाला. सदर नुकसान विद्युत मंडळाच्या गलथान कारभारामुळे झाल्याने नुकसानग्रस्त शेतक-यांना भरपाई मिळावी व शाहू हमीदवाडा, बिद्री, संताजी घोरपडे, अन्नपुर्णा शुगरचे जळलेल्या ऊसाची लवकर उचल करावी अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Stories

कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा ‘लॉकडाऊन नाही’चा पुनरुच्चार

Abhijeet Shinde

‘तौत्के’ चक्रीवादळ होणार आणखी तीव्र

datta jadhav

कोल्हापूर : किलबिलाटाने शाळा गजबजल्या

Abhijeet Shinde

कोल्हापूर : स्वराज्याची गुढी राजकीय ठरु नये..!

Abhijeet Shinde

Rajya Sabha Election LIVE : सर्वपक्षीय २८५ आमदारांचं मतदान पूर्ण, मात्र मतमोजणी सुरू होण्यास विलंब लागणार

Abhijeet Shinde

बिनधास्तपणे चिकन खा,बर्ड फ्लू होत नाही

Abhijeet Shinde
error: Content is protected !!